‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ फलाटावर येणार २८ सप्टेंबर २०१८ रोजी

‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ फलाटावर येणार २८ सप्टेंबर २०१८ रोजी

       मुंबई-पुणे-मुंबई आणि मुंबई-पुणे-मुंबई २ – लग्नाला यायचंच ! या चित्रपटांच्या उत्तुंग यशानंतर दिग्दर्शक सतीश राजवाडे घेऊन आले आहेत, याच शृंखलेतला तिसरा चित्रपट ‘मुंबई पुणे मुंबई ३’- सुख म्हणजे नक्की काय असतं ! या चित्रपटाचं चित्रीकरण डिसेंबर २०१७ मध्येच सुरु झालं होतं. २७ एप्रिल २०१८ ला हा चित्रपट प्रदर्शित होईल असं हि सांगण्यात आलं होतं. पण काही कारणास्तव चित्रपटाचं प्रदर्शन लांबणीवर टाकण्यात आलं. त्यामुळे चाहत्यांची आतुरता ताणली गेली. पण आज या गोष्टीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे कि “हा चित्रपट येत्या २८ सप्टेंबरला प्रदर्शित केला जाईल.”

एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे निर्माते आहेत संजय छाब्रिया आणि ‘५२ फ्रायडे सिनेमाजचे’ अमित भानुशाली. हा चित्रपट सतीश राजवाडे यांनी दिग्दर्शित केला असून  स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे ही सुपरहिट जोडी पुन्हा एकदा सज्ज झाली आहे प्रेक्षकांचं मनोरंजन करायला. ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ची कथा पल्लवी राजवाडे यांनी लिहिली आहे. चित्रपटाची पटकथा आणि संवाद अश्विनी शेंडे आणि पल्लवी राजवाडे यांनी लिहिले आहेत.

MPM शृंखलेतल्या पहिल्या चित्रपटात गौतम आणि गौरी पत्ता विचारण्याच्या निमित्ताने भेटले. गौरीच्या पुण्याविषयी असलेल्या पूर्वग्रहांमुळे गौतमच्या स्वाभिमानाला ठेस लागली आणि गौरी, गौतमलाच भेटायला आलेली आहे, हे कळल्यावरही गौतमने हे रहस्य गौरीसमोर उघड केलं नाही. गौतमला लग्नासाठी मुलगी पाहण्याचा हा वेगळा प्रकार अनुभवायचा होता. म्हणून त्याने तो पूर्ण दिवस गौरी सोबतच घालावला. तिला जाणून घेतलं. तिच्या आवडी निवडी, तिचा स्वभाव, तिच्या नवऱ्याकडून असलेल्या अपेक्षा. इतकंच काय तर गौरीचा प्रियकर कोण आहे ? आता गौरीची मनस्थिती कशी आहे ? अशा सगळ्याचा त्याने मागोवा घेतला. या प्रवासात गौरीला हि नकळत गौतमबद्दल बऱ्याच गोष्टी कळल्या, अगदी त्याने एखाद्या मुलीसोबत प्रणय केला आहे का ? हे सुद्धा ! अन शेवटी गौरीची मुंबईला परत जाण्याची वेळ आली, तेव्हा गौतमने स्वताविषयी सांगून गौरीला लग्नासाठी विचारलं. गौरी गोड लाजून हसली. त्यातंच तिचं उत्तर आलं.

MPM २ लग्नाला यायचंच ! या चित्रपटाची सुरुवातच गौतमच्या हे सांगण्यापासून होते कि हे लग्न होणार नाही. गौरीच्या आयुष्यात तिचा पूर्वाश्रमीचा प्रियकर आल्यामुळे गौरीच्या डोक्यात लग्नासंबंधी गोंधळ निर्माण झालेला असतो. राग,रुसवे-फुगवे,समाज-गैरसमज यांच्या संघर्षातून पार होऊन शेवटी गौरी या लग्नाला तयार होते.

आणि आता येतोय MPM ३ ज्याची tagline आहे “सुख म्हणजे नक्की काय असतं !” हि tagline प्रशांत दामले यांच्या ‘एका लग्नाची गोष्ट’ या नाटकातील एका गाण्याच्या ओळीवरून घेण्यात आलेली आहे. आणि ते गीत खालीलप्रमाणे आहे.

गीतकार : श्रीरंग गोडबोले

मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं ?

काय पुण्य असलं कि ते घरबसल्या मिळतं !

दान घेतानाही झोळी हवी रिकामी,

भरता भरता थोडी पुन्हा वाढलेली,

आपण फक्त घेताना लाजायचं नसतं.

देव देतो तेव्हा छप्पर फाडून देतो,

हवंय? नको! ते म्हणणं प्रश्नच नसतो.

आपण फक्त दोन्ही हात भरून घ्यायचं नुसतं.

“सुख म्हणजे नक्की काय असतं…. शोधण्या सुखाचा किनारा दोन वाटांना एक व्हावं लागतं !!” गौरी आणि गौतमच्या लग्नानंतरच्या आयुष्यातील संघर्ष या चित्रपटात दाखविण्यात येईल असं वाटतं. कारण आपलं आयुष्य हे अनिश्चितता आणि सुख-दुखांचा खेळ आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात त्याला वेगवेगळे अनुभव येतात… त्या अनुभवांचीच कथा तयार होते. गौरी आणि गौतम आपल्या नात्यातील इतका संघर्ष पार   करून आज या इथवर येऊन पोहोचले आहेत.. या पुढेही त्यांच्या आयुष्यात सगळं आलबेल असेल असं नाही. या पुढची कथा तर अजूनच रोमांचक असेल… २ स्वच्छ मनाची पण २ वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक एकत्र नांदायला लागतात तेव्हा भांड्याला भांड लागायचंच कि हो.. “सुख म्हणजे नक्की काय असतं?” या गीताची पण एक दुसरी बाजू आहे.

 

गीतकार – श्रीरंग गोडबोले

खर सांगा सुख म्हणजे काय असतं ?

मिळालं वाटे तोवर हातात काही नसतं

सुख म्हणजे दुखःचा उरलेला गंध,

रडता रडता हसण्याचा आवडता छंद,

मन पाखरू हे जगण्यासाठी आसुसलेलं असतं.

सुख म्हणजे मृगजळ,

सुख म्हणजे वारा,

सुख हणजे शब्द बापुडा.. केवळ वारा

कुठल्या क्षणी मुठ्ठीमधुनी निसटून जात असतं.

खरं सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं? हा प्रश्न तर सगळ्यांनाच पडलेला असतो. आता याचं उत्तर गौरी आणि गौतम म्हणजेच स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे कसं शोधतायत हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

मनोरंजन विश्वामधील ताज्या घडामोडींसाठी आणि गमती जमती जाणून घेण्यासाठी फिल्मीभोंगाला भेट देत रहा. खुश रहा..फिल्मी रहा.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author

Filmi Shinde

कथा, पटकथा, संवाद या तिन्ही विभागात प्राविण्य मिळवलेले सुशांत शिंदे सध्या चित्रपटलेखन, मालिकालेखन आणि डिजीटल क्षेत्रासाठी काम करत आहेत. सुशांत शिंदे याचं लेखन प्रेक्षकांना हास्य, रहस्य आणि नाट्य याच्या अद्भुत मिश्रणाने खिळवून ठेवतं. फिल्मी भोंगा या वेब पोर्टल साठी ते 'फिल्मी शिंदे' या नावाने ब्लॉग लिहितात.