पुन्हा एकदा वैभव तत्ववादी आणि प्रार्थना बेहेरे ही हॉट फेवरेट जोडी येणार एकत्र

पुन्हा एकदा वैभव तत्ववादी आणि प्रार्थना बेहेरे ही हॉट फेवरेट जोडी येणार एकत्र. लवकरच तुमच्या जवळच्या चित्रपट गृहात..!!

 

आजकाल इडली किंवा ढोकळा  आपल्याला घरी तयार करायचा असेल तर त्याचं सगळं साहित्य ठरलेल्या प्रमाणात एकत्र करून पॅक केलेलं आपल्याला बाजारात विकत मिळतं, घरी आणून ते पाणी घालून एकत्र करून इडल्या किंवा ढोकळा बनवता येतो. किती सोपं झालंय आता हे पदार्थ घरी बनवणं.  त्याला  “रेडी मिक्स” म्हणतात. फटाफट पाहिजे तो नाश्ता तय्यार. दुसरं एक ‘रेडी मिक्स’ असतं ते म्हणजे सिमेंट, वाळू, खडी, हे सगळं ठराविक प्रमाणात मिसळून त्यात पाणी घालून एका मिक्सरमध्ये तयार करून आणतात आणि एखाद्या बिल्डिंगच्या कन्स्ट्रक्शन कामासाठी, स्लॅबसाठी हे “रेडी मिक्स” आजकाल सगळीकडे वापरलं जातंय.  

असली सगळी रेडी मिक्स आपल्याला माहिती आहेत, पण  “जालिंदर कुंभार” नावाचा तरुण दिग्दर्शक एक नवीन “”रेडी मिक्स”” घेऊन आपल्या भेटीला येतोय ८ फेब्रुवारीला. ते कसलं ‘रेडि मिक्स’ आहे हे काही कळलं नाही. 

 

READ ALSO :  वेबसिरीज क्षेत्रातही रोवला मराठी झेंडा.. पहा कोण कोण गाजवतायत आपले नाव हिंदी आणि मराठी वेबसिरीज मध्ये

अहोsssss हे  रेडी मिक्स म्हणजे  “” रेडी मिक्स”” नावाचा एक अफलातून सिनेमा घेऊन येतोय हा दिग्दर्शक. आता ह्यात काय काय मिक्स केलंय ते काही कळलं नाही बुवा अजून. पण हे मिक्स बनवणारे जे कलाकार आहेत ते कोण कोण आहेत हे जर तुम्हाला कळलं ना तर पुढचं तुम्ही ऐकणार नाही, धावतच सुटाल. तिकीट बुक करायला. पण थांबायला लागणार तुम्हाला. कारण तारीख जरा लांब आहे अजून. पण जर ही तारीख आणि कलाकार तुम्हाला आधीच कळले तर तुम्हाला परफेक्ट प्लॅनिंग करता येईल म्हणून तर हे सगळं सांगायला लागलं तुम्हाला. ह्या नवीन वर्षातल्या नवीन प्रकारच्या ‘रेडी मिक्स’ मध्ये काम करणारे तुमचे आवडते कलाकार आहेत, “वैभव तत्ववादी” ,  “प्रार्थना बेहेरे”, आणि “नेहा जोशी” .  चित्रपट आणि टी व्ही मालिका ह्यात गाजलेला एक हँडसम हीरो म्हणजे  ‘वैभव तत्ववादी’ सध्या अनेक चित्रपटात तो गाजतो आहे. ‘मितवा’  ह्या चित्रपटातली स्वप्नील जोशी बरोबर काम केलेली ही चमकलेली तारका. आणि  ‘ का रे दुरावा’ ह्या मालिकेतली खतरनाक व्हिलन म्हणजे ही नेहा जोशी. सगळे अभिनय संपन्न कलाकार आणि जालिंदर सारखा खंदा दिग्दर्शक म्हणजे भारीच असणार आहे हे “रेडी मिक्स”. फक्त आता तारीख लक्षात ठेवा ८ फेब्रुवारी. आणि अनुभव घ्या एका नवीन “रेडी मिक्स” चा….

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना...

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा...

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा ई. ना स्थान नसते. प्रेमापुढे...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व...

About The Author