मुळशी पॅटर्न आवडला ना..?? आता लवकरच येईल रेती पॅटर्न.

मुळशी पॅटर्न आवडला ना..?? आता लवकरच येईल रेती पॅटर्न.

 

एखाद्या खेडेगावाची ओळख बदलली, म्हणजे तिथं सरकारनी काही योजना राबवून त्या भागाचा विकास करायचं ठरवलं की कुठल्यातरी गोटातून ही माहिती त्या सगळ्या परिसरात आधीच पोचते. आणि गावाच्या विकासाच्या आधी पुढाऱ्यांच्या फुकट खाणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हातात आयतं कोलीत सापडतं. आधीच सुरू होतो ह्यांच्या डोक्यातल्या कल्पनांचा विकास. कवडीमोल असलेल्या जमिनी ह्या राजकारण्यांच्या वरधास्तामुळे हे कार्यकर्ते शोधायला लागतात. आणि त्यात सापडतात गरीब, लाचार, असहाय जमिनीचे मालक. त्यांना किरकोळ आमिष दाखवून ही मंडळी ह्या जागा हडप करायला लागतात. आणि मोठमोठ्या जमिनी सत्ताधीशांच्या जवळच्या लोकांच्या मालकीच्या होऊन जातात स्वस्तात. 

ज्या लोकांचा विरोध होतो त्यांना धमक्यातून सरळ केलं जातं. जे त्या धमक्यांना जुमानत नाहीत त्यांना कायमचं संपवलं जातं, पण काहीही बोभाटा न होता. आणि साम्राज्य सुरू होतं जमीन माफियांचं,  कारण वरून वरद हस्त असतो ना…. “”इतके वर्ष डोक्यात फिट झालेला हा विषय डोक्यातून बाहेर आला आणि त्याला कागदावर उतरवला  “प्रवीण तरडे” ह्या मराठीतल्या रावडी कलाकाराने.  त्याच्यावर काढला एक अफलातून चित्रपट ज्याचं नाव “”मुळशी पॅटर्न””. नुकताच रिलीज झालाय हा वेगळ्या विषयावरचा चित्रपट. अकरा दिवसात अकरा कोटी चा गल्ला जमवलाय ह्या चित्रपटानं. आधी हा नावं ठेवला गेलेला चित्रपट, पण आज बॉक्स ऑफिस वर दाखवतोय कमाल. सकाळपासून रात्रीच्या शेवटच्या शो पर्यंत सगळे शोज ‘हाऊस फुल्ल’. 

 

READ ALSO :  तिचं सौंदर्य इतकं लोभस आहे की चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये 5 सेकंदाचं दर्शन सुद्धा चाहत्यांना मोहून टाकतंय….!

“”प्रवीण तरडे”” म्हणजे एक व्हिलन ला साजेसा चेहेरा मिळालेला मराठी कलाकार, लेखक, आणि आता दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध झाला. मुळशी तालुक्यातल्या एका खेड्यात राहणारा हा रावडी कलाकार. “रेगे” ह्या चित्रपटाचं लेखन सुद्धा प्रवीण तरडे ने केलं. अशाच एका असल्याच खतरनाक विषयावर लेखन करून त्याने आणखी एक नवीन चित्रपट काढायची तयारी चालवली आहे. ह्या सगळ्या माफियांना त्याने घडताना पाहिलंय म्हणून हा विषय त्याने अफलातून रंगवला आहे.  ह्या नवीन चित्रपटाचे नाव असणार आहे ” रेती पॅटर्न”  हा नावाप्रमाणे रेती माफियांवर असणार आहे. निसर्गाच्या अमाप संपत्तीवर घाव घालून त्यातून जनतेला लुटणारे हे रेती माफिया प्रेक्षकांच्या समोर  त्यांचे असली रूप उघड करत घेऊन येणार आहे हा नवा चित्रपट. सरकारी यंत्रणेला हे माफिया कशी खिळखिळी करून आपले साम्राज्य कसे वाढवत आहेत हे प्रत्यक्ष आपल्याला बघायला मिळणार आहे. 

मुळशी पॅटर्न मध्ये अनेक दिग्गज कलाकार पाहायला मिळालेत. “”रेती पॅटर्न”” ह्या चित्रपटात कोण कोण असणार हे अजून कळणार आहे. हे दोन्ही विषय असे आहेत की अशा चित्रपटात हिरॉईन चं काही कामच नाही. त्यामुळे प्रवीण तरडे याने एकही हिरॉईनचा डान्स किंवा काहीतरी अंगाचं प्रदर्शन करणारी मुलगी  मुळशी पॅटर्न मध्ये आणली नाही . गाणी जी घेतलीत ती ‘आरारारा आरारार’ असली रावडी धर्तीची आहेत. ‘आयटम सॉंग’ च्या ऐवजी ‘भाईटम सॉंग’ आहे. तसे त्याच्या नवीन ‘रेती पॅटर्न’ मध्ये काय आहे. गाणी आहेत काय? हिरॉईन आहे का? हे अजून गुलदस्त्यात आहे. पण प्रेक्षकांना काहीतरी वास्तव बघायला मिळणार हे नक्की. खोट्या प्रेमाच्या कथे पेक्षा असलं काहीतरी वास्तव बघायला लोक गर्दी करतात हे मुळशी पॅटर्न ने सिद्ध करून दिलंय, मग आता आणखी काही तरी वेगळं बघायला सुद्धा गर्दीच होणार. कारण काहीतरी थ्रील्लिंग असणार. सत्य असणार, जे आत्तापर्यंत आपण फक्त ऐकून होतो. प्रत्यक्ष काय असतं हे माफिया साम्राज्य हे बघायला मजा येईल.

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना...

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा...

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा ई. ना स्थान नसते. प्रेमापुढे...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व...

About The Author