जगात अनेक नामांकित व्यक्ती आहेत आणि त्या नामांकित व्यक्तींचे चाहते सुध्दा अनेक आहेत. कोणी कलावंताचा, कोणी गायकाचा, कोणी सामाजिक कार्यकर्त्याचा तर कोणी खेळाडूचा चाहता असतो. असा हा विविध क्षेत्रातील व्यक्तींचा चाहतावर्ग दुरदूरपर्यंत पसरला आहे. हे चाहते त्यांच्या लाडक्या व्यक्तिमत्त्वासाठी अनेज भेटवस्तू आणत असतात. चाहत्यांसाठी हे एखादे व्यक्तिमत्त्व एखादया देवासारखेच असते. त्या व्यक्तीचा वाढदिवस असो किंवा त्याच्या आयुष्यातील कोणताही महत्वाचा दिवस हा त्याच्या चाहत्यांसाठीही तितकाच महत्वाचा असतो. चाहते हे दिवस जे त्यांच्या आवडत्या व्यक्तिमत्वांसाठी विशेष असतात हे अगदी एखाद्या सणासारखेच साजरे करतात.

तेंडल्या च्या कथेविषयी

त्या व्यक्तिमत्वाचे लक्ष वेधून घेणे या हेतूने चाहते त्या व्यक्तित्वासाठी  वेगवेगळ्या गोष्टी करत असतात. काहीवेळा चाहत्यांची कृत्ये धोकादायक असतात फार काहीवेळा कौतुकाने भारावून टाकणारी असतात. सचिन तेंडुलकर या क्रिकेट जगतातील देवावर चित्रपटाची निर्मिती केली आहे ती सचिन जाधव या चाहत्याने. सचिन जाधव याने तेंडल्या हे नाव त्याच्या चित्रपटासाठी निवडले आहे . तेंडल्या हा चित्रपट एक चाहत्याच्या कथेवर आधारलेला असून त्या चाहत्याबरोबर घडणाऱ्या घटना आपल्याला तेंडल्या या चित्रपटात पाहायला मिळतील.

तेंडल्या चे डिस्क्लेमर

तेंडल्या बद्दल बोलताना तेंडल्या चे दिग्दर्शक सचिन जाधव यांनी सांगितले आहे की, चाहत्यांच्या मनातील सचिनचे स्थान हे फार महत्वाचे आहे आणि याच स्थानाला अधोरेखित करत सचिन तेंडुलकर याच्या चाहत्यांविषयी केलेलं भाष्य  तेंडल्या  या चित्रपटात पाहायला मिळेल.या चित्रपटाचे विशेष काय आहेत हे चित्रपट प्रदर्शित झाल्याशिवाय सांगता येणार नाही परंतु चित्रपटाच्या घोषणेनंतर आत्ता आपल्या लक्षात येते आहे की चित्रपटाचे डिस्क्लेमर हे लक्षवेधी आहे. सहसा चित्रपटांचे डिस्क्लेमर ह साध्या सरळ आणि सोप्या भाषेत असतात. तेंडल्या या चित्रपटाचे डिस्क्लेमर हे देखील साध्या सोप्या भाषेतच आहे परंतु ते जरा विनोदी शैलीत आहे . या डिस्क्लेमर मध्ये प्रमाण भाषेच्या ऐवजी बोली भाषेचा वापर केलेला दिसून येत आहे. तेंडल्या चे डिस्क्लेमर असे की, ‘आमच्या चित्रपटातील पात्रे आज्याबत काल्पनिक नाहीत, लगेच हुडकाया जाऊ नका, कारण ते कुठं घावणार बी नाय…अख्या ऑल इंडियात जिवंत असू द्यात की मेलेलं असू द्या.. त्याच्या संग योगायोगानं नव्ह… तर ओढून ताणून आणलं तरीबी संबंध जुळणार नाय’

केवळ राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीय स्तरावरच नाही तर आबालवृद्धांमध्ये सर्वच स्तरावर क्रिकेट हा खेळ खेळला जातो. या सर्वच चाहत्यांचे क्रिकेट वर असलेले जीवापाड प्रेम हे अफलातून पद्धतीने या चित्रपटातून मांडण्यात आले आहे . या चित्रपटाने क्रिकेटप्रेमींमध्ये एक वेगळीच उत्सुकता निर्माण केली आहे.