बघा सिद्धूचा डबल धमाका..!! लवकरच..

बघा सिद्धूचा डबल धमाका..!! लवकरच..

सिद्धार्थ जाधव एक अत्यंत गुणी कलाकार आहे.. अगदीच सर्वसाधारण चेहरा पण तरीही निरागस भाव.. बारकुडी अंगकाठी पण अभिनयात खासा दम.. आवाज सुद्धा खर्ज्यात पण त्याचा योग्य उपयोग सिद्धूच करू जाणे.. विनोदाचं उत्कृष्ट टायमिंग ही त्याची हातोटी आहे..

रंगभूमी, मराठी चित्रपट आणि सगळ्यांना कायम ‘भोज्या’ वाटणारे हिंदी चित्रपट असा मोठा प्रवास सिद्धू म्हणजेच आपल्या सिद्धार्थ जाधवने केला आहे.
त्याची गोलमाल चित्रपटातील गोपालला मारायला धजावणारी व्यक्तिरेखाही लक्षात राहील अशीच आहे. त्याच्या किरकोळ शरीरयष्टीचा आणि मोहेंजोदडो संस्कृतीच्या वाटणाऱ्या चेहरेपट्टीचा त्याला विनोदी कलाकार म्हणून खूपच फायदा झाला आहे.

माणसाचे रूप कसे असावे हे त्याच्या हातात नसते पण म्हणून रडत बसण्यापेक्षा प्रेक्षकांना हसवण्यासाठी ते वापरून सिद्धूने खरंच एनकॅश केले आहे आणि हीच हाडाच्या अभिनेत्याची ताकदही आहे. पण हा विनोदाचा राजा फक्त एवढ्यावरच थांबला नाहीये. काही सिनेमात ‘कॅरॅक्टर एक्टिंग म्हणजेच चरित्र अभिनयातदेखील सिद्धूने बाजी मारली आहे. रोमँटिक हिरो म्हणून सुद्धा त्याने आपले नशीब आजमावले आहे.

कुठलेही पात्र असो सिद्धूची खास अदाकारी लक्षात राहते. फास्टर फेणे मधला रिक्षावाला, दे धक्का मधला टमटमवाला, आणि असंख्य चित्रपटातील त्याचे लीड रोल किंवा साईड रोल प्रसिद्ध आहेत, पण सिद्धू तो छा ही जाता है.. मी शिवाजी राजे भोसले बोलतोयमधला उस्मान भाई हा खलनायकसुद्धा त्याने उत्तम साकारला होता.

आता तर सिद्धार्थ जाधवचा डबल धमाका ह्या महिन्यात बॅक टू बॅक त्याच्या चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. रितेश देशमुखच्या आगामी ‘माऊली’ ह्या मराठी चित्रपटात आणि रणवीर सिंग – रोहित शेट्टीच्या ‘सिम्बा’ ह्या हिंदी चित्रपटातदेखील सिद्धार्थ आपल्याला दिसणार आहे.

गम्मत म्हणजे साधासुधा डबल धमाका नाही तर ह्या दोन्ही चित्रपटात योगायोगाने तो पोलिसांच्या वर्दीतच आहे. दोन्हीमध्ये तो ‘सुपर कॉप हिरोचा’ उजवा हातच असावा असे ट्रेलर वरून तरी वाटते. पोलीस म्हटलं की लाथा बुक्क्यांची ढिशुम ढिशुम आणि बंदुकीची ठांय ठांय आलीच. त्यात रोहित शेट्टीची फिल्म म्हणजे पोलिसांचा रुबाब आणि गाड्या उडवणे हेही ओघाने आलंच.. रितेशचा माऊलीदेखील दमदार हाणामारीचा ‘लै भारी’ चा सिक्वेल वाटतो. आणि अशा दोन्ही चित्रपटात सिद्धूची हिरोसोबत जुगलबंदी पाहायला मिळेल.

सिद्धार्थची भूमिका लांबीला जास्त नसली तरी तो त्या भूमिकेची ऊंची नेहमीच वाढवतो आणि हेच त्याच्या यशाचे गमक आहे. त्यामुळे कायम आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या सिद्धूला ह्या वेळी पुन्हा एकदा चाहत्यांच्या लक्षात राहायची संधी मिळतीये. आणि त्या संधीचं सिद्धार्थ सोनं करेल हे निश्चित आहे. ह्या दोन्ही चित्रपटांसाठी सिद्धार्थ जाधवला फिल्मीभोंगा मराठीतर्फे खूप खूप शुभेच्छा..!

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना...

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा...

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा ई. ना स्थान नसते. प्रेमापुढे...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व...

About The Author