मर्डर पण परफेक्ट असतो बर का..!! आणि तो होणार लवकरच रंगमंचावर..!

मर्डर पण परफेक्ट असतो बर का..!! आणि तो होणार लवकरच रंगमंचावर..

मर्डर म्हटलं की डोक्यासमोर येतात धारदार चाकू नाहीतर सायलेंट गन.. आणि मग सगळीकडे रक्ताचा सडापण परफेक्ट मर्डर असा नसतो.. तो असतो एकदम थंड रक्ताच्या माणसाने केलेला.. एकदम सराईतपणे.. मागे त्याचा कसलाही मागमूस ही नाही. एखादा पुरावा ही नाही.. पोलीस, सी आई डी आणि हेर कोणकोण डोकं खपवतात पण पदरी पडते फक्त निराशा.. शोधणार काय आणि कसे..?? केस बंद करायची वेळ ही येते. पण गुन्हेगार मात्र समोरून गेला तरी सापडत नाही.. आणि सापळा तर मात्र त्याची खैर नाही.. त्याची मर्डर कथा ऐकण्याचा मात्र थरार अनुभवायचा.. बस्स..!!

असलीच एक गॅंग पुण्यात खून करायची. कसलाच पुरावा मागे न ठेवता. दर महिन्याला ठरलेल्या तारखेला एक मर्डर…! आणि ही गॅंग कधीच सापडायची नाही. खूप महिने शोध चालला होता. पण शेवटी सापडले आणि गेले फटक्यात फासावर. जक्कल, सुतार आणि चांडक ह्यांची होती ती गॅंग. ह्यांच्यावर नंतर एक चित्रपट सुद्धा आला होता. पूर्वी “आल्फ्रेड हिचकॉक” हा असल्या भयानक चित्रपटांची निर्मिती करायचा. लोक थिएटरमध्ये घाबरून बेशुद्ध पडायचे. म्हणून असले चित्रपट लावले की थिएटरच्या बाहेर एक एम्ब्युलन्स उभी करून ठेवायचे.  पण असले टरकवणारे चित्रपट चांगले चालायचे सुद्धा.  आल्फ्रेड हिचकॉक हा सगळे असलेच चित्रपट काढायचा. त्या चित्रपटांची  कथा पण तो स्वतःच लिहायचा. ज्यांना असलं काहीतरी अंगावर काटे उभे करणारं आवडतं ते ह्या चित्रपटांना  हमखास गर्दीच करायचे. त्या नंतर आपल्याकडे काही थरार असलेली नाटकंही आली. ती सुद्धा चांगली चाललीहो. कथानक चांगलं असलं आणि त्यातले कलाकार भारी असले की ही नाटकं पण चांगली चालतात.

 
 

READ ALSO :  रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या ह्या अभिनेत्रींच्या नावाच्या परितोषकाने होतोय मुक्त बर्वेचा सन्मान..

आजकाल मराठी चित्रपट आणि नाटकं  एकदम चाबूक असतात, हे आपल्या कलाकार, दिग्दर्शक मंडळींनी सिद्धच करून दाखवलंय. त्यामुळे मराठी चित्रपट आणि नाटकांना रसिक भरभरून दाद देतात. असलंच एक नाटक रंगभूमीवर येतंय, त्याचीकथा  आहे ‘आल्फ्रेड हिचकॉकचीच’ बरंका. ह्या हिचकॉक ला जाऊन  आता किती वर्षे झाली पण अजूनही त्याच्या चित्रपट, आणि कथांवर लोक आहेत फिदा, म्हणून विजय केंकरे ह्यांनी हे नाटक दिग्दर्शित करायचं ठरवलंय. ह्यातले कलाकार पण असेच आहेत ज्यांच्यावर गेली अनेक वर्षे लोक प्रेम करत आले आहेत. एक विनोदी नाटकं किंवा विनोदी मालिकांमध्ये विनोदी कामं करणारा कलाकार, पण त्याने काही थरार भूमिका पण जबरदस्त केल्यात, आणि  दुसरा कलाकार म्हणजे पूर्वी नाटकं केलेलाच,  पण गेली १९वर्ष नाटकांपासून थोडा  लांब गेलेला पण आत्ता बऱ्याच गाजलेल्या चित्रपटांचा दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध आहे. असे हे दोन खंदे कलाकार ह्या नाटकात दमदार भूमिका करणार आहेत.

कोण असतील हे दोन कलाकार? विनोदी पण आणि  थरार पण,  दोन्ही कामे सहज करणारा  “पुष्कर श्रोत्री”  आणि दुसरा म्हणजे आत्ता भरपूर कमाई करणारा, चालू असलेला मराठी चित्रपट  ” मुंबई – पुणे – मुंबई -३.”  चा दिग्दर्शक  “सतीश राजवाडे”. “सतीश राजवाडे” ने  ‘प्रेमाची गोष्ट’ , ती सध्या काय करते’ , मुंबई – पुणे – मुंबई -३ असल्या गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन केलंय, म्हणून तो वजनदार आहे.  त्यामुळे ह्या नाटकात त्याला १९ वर्षानंतर एका ताकतवान भूमिकेत बघायला मजा येणार आहे. पुष्कर श्रोत्रीच्या पुष्कळ भूमिका आपण बघितल्याच आहेत. पण ही जरा हटके भूमिका आपण बघणार आहोत. ह्या दोघांच्याबरोबर आणखी एक “जोडी” असणार आहे,  ती कोणती जोडी ?  आणि  ह्या नाटकात नक्की हिचकॉक चा कसला थरार आहे? रंगमंच नक्की गाजवेल हे नाटक.. पण नक्की मर्डरर कोण हे “२१डिसेंबरच्या ”  ‘गडकरी रंगायतन’ मधल्या ‘शुभरंभाच्या प्रयोगात’  बघायला मिळणार आहे. एवढं सगळं आहे पण ह्या नाटकाचं नाव काय??

सावधगिरी बाळगून केलेला खून  म्हणजेच…..

   ” अ   परफेक्ट   मर्डर  “

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळबऱ्याच दिवसांपासून नचिकेत प्रधान ‘गर्लफ्रेंड’च्या शोधात असल्याचं तुमच्या कानी आलं असेल. गर्लफ्रेंड कशी असावी? या बद्दलच्या त्याच्या अपेक्षाबद्दल देखील तुम्ही बरंच काही ऐकून असाल. नचिकेतच्या प्रयत्नाला अखेर यश आले असून...

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

छत्रपतींचे महापराक्रमी योद्धा ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा पोस्टर लाँच दिमाखात संपन्नशिवराज्याभिषेक दिना निमित्त हेलिकॉप्टरमधून गड किल्यांचे दर्शन घेत वाहिली शिव छत्रपतींना मानवंदना.हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य...

ललित प्रभाकरचा ‘मीडियम स्पाइसी’ व्हिडीओ

ललित प्रभाकरचा ‘मीडियम स्पाइसी’ व्हिडीओ

‘मीडियम स्पाइसी’ या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली असून या चित्रपटात एक प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेता ललित प्रभाकर बरोबर चित्रपटाच्या टीमने एक युनिक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यातून सेटवर असणाऱ्या कलाकारांकडून चित्रपटाच्या मूड विषयी काहीशी...

About The Author