उन्हाळ्याच्या सुट्टीत धम्माल मस्ती करण्यासाठी बच्चेकंपनीला ‘वायू’ चे निमंत्रण

एक कोवळं रोपटं…त्याच्या जागेवर आनंदाने‌ डोलणारं….अचानक उपटून दुसरीकडे पेरलं तर काय होईल त्याचं ?  कोल्हापूरात आपल्या घरात.. अंगणात…मित्रांमध्ये…रमलेला हा मुलगा..”.वायू “….. त्याला अचानक उचलून‌ मुंबईत आणलं आई-बाबांनी…. गोंधळलेल्या… घुसमटलेल्या वायूच्या मनांत आलेला हा वैताग…श्या… कुठे येऊन पडलो यार….श्या…!!

उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे लहान मुलांसाठी धम्माल, मस्ती करण्याची पर्वणीच.सुट्ट्यांमध्ये लहान मुले मनसोक्त खेळतातआणिबागडतात. अशातच त्यांच्या सुट्ट्या अधिक रंगतदार करण्यासाठी दिग्दर्शक विजू माने घेऊन आले आहेत बालचित्रपट ‘मंकी बात’. नुकतेच या चित्रपटातील श्या… कुठे येऊन पडलो यार….श्या…!! हे गाणे रिलीज झाले असून हे गाणे अल्पावधीत मुलांच्या मनात घर करण्यात यशस्वी ठरले आहे.

जरा काही आवडेनासं झाला  की “श्या…” म्हणत कंठ काढताना आपण लहान मुलांना बघितले असेलच.‘मंकी बात’ मधील वायू मुंबई शहरात येण्यापूर्वी मस्त कोल्हापुराला राहायचा.तेथीलजिवलग मित्रांचा सहवास आणि सोबतीला नदी, दऱ्या, डोंगर होता, या सर्व गोष्टीत तो रमून जायचा. नयनरम्य निसर्ग आणि बागडण्यासाठी त्याला पूर्ण रानं मोकळ होते.शहरात आल्यानंतर मात्र मर्यादित जागेचं आयुष्य त्याला आवडेनासं झाले. त्याचाशी कुणी लवकर गट्टी करेना, कुणी सोबत खेळू देईना. शिवाय शाळेतही जीवाला खाणारा एकटेपणा आहेच यामुळे वायू म्हणतोय श्या… कुठे येऊन पडलो यार…..!!

प्रसिद्ध दिग्दर्शक विजू माने यांची  ‘मंकी बात’ हि कलाकृती लहान मुलांसाठी उन्हाळ्याच्या सुट्ट्यामधली खास मेजवानी ठरणार आहे. निष्ठा प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाची प्रस्तुती आकाश पेंढारकर, विनोद सातव, अभय ठाकूर, प्रसादा चव्हाण, शंकर कोंडे यांची असून विवेक डीरश्मी करंबेळकरमंदार टिल्लू आणि विजू माने निर्माते आहेत. चित्रपटाची गीते आणि संवाद  संदीप खरे यांचे तर  संगीत डॉ. सलील कुलकर्णी यांनी दिले आहे.  ‘मंकी बात’ मध्येबाल कलाकार वेदांत, पुष्कर श्रोत्री आणि भार्गवी चिरमुले प्रमुख भूमिकेत आहेत.चित्रपटाची कथा महेंद्र कदम आणि विजू माने यांची आहे. खास बच्चेकंपनीसाठी उन्हाळ्याच्या सुट्टीत येणारा हा चित्रप येत्या १८ मी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author