मणिकर्णिका मध्ये दिसतील आपले दोन मराठमोळे आर्टिस्ट.. जाणून घ्या त्यांच्या पात्राबद्दल.

मणिकर्णिका मध्ये दिसतील आपले दोन मराठमोळे आर्टिस्ट.. जाणून घ्या त्यांच्या पात्राबद्दल.

हल्ली भन्नाट चित्रपट म्हणजे मराठी चित्रपट आणि त्याच बरोबर चमकणारे नवनवीन चेहरे हे जणू समीकरण झाले आहे. मराठी मनोरंजनाच्या चांगल्या विषयाला कायम मागणी असते. आणि असे विषय हाताळणारे क्लास अभिनेते मराठी चित्रपटसृष्टीच्या भट्टीतून रोज तावून सुलाखून बाहेर येत आहेत. मराठी सिनेमाला बॉलिवूड प्रमाणे टॉल डार्क हँडसम हिरो मात्र फारसे मिळाले नाहीत. पण सध्या हा स्टीरिओ टाईप सुद्धा मोडीत निघाला आहे असे नक्कीच म्हणता येईल. वैभव तत्ववादी हा असाच एक टॉल डार्क आणि हँडसम हंक मराठी सिनेमाला मिळालेला हिरा आहे. अभिनयात उत्तम, दिसायला भारी आणि डान्स मध्येसुद्धा कोणा बॉलिवूड हिरोला टक्कर देईल असा वैभव..

 

READ ALSO :  फॉरेन रिटर्न नाही आमच्याकडे येतोय डोंबिवली रिटर्न.. लवकरच…

डॅशिंग व्यक्तिमत्व असलं तरी कॉफी आणि बरंच काही मध्ये अत्यंत हळवा ‘निषाद’ त्याने साकारला आणि सगळ्या मुलींच्या हृदयात जाऊन बसला. सध्या मराठीतल्या ह्या मोस्ट एलिजीबल बॅचलरने हिंदीत सुद्धा याआपले बस्तान चांगलेच बसवले आहे. बाजीराव मस्तानी मध्ये विशेष लक्षवेधी भूमिका केल्यावर तो आता पुन्हा मणिकर्णिका ह्या पिरिओडिक सिनेमा मध्ये झळकणार आहे. पुरण सिंघ ही त्याची व्यक्तिरेखा. म्हणजेच राणी लक्ष्मीबाई झालेल्या कंगना राणावत बरोबर आपला वैभव झाळकणार आहे. हिंदी मध्ये वैभवनी बरेच काम केले आहे. पण ह्या चित्रपटामधून अजून एक मराठी चेहरा ‘बॉलिवूड’ मध्ये पदार्पण करत आहे. पवित्र रिश्ता ह्या झी वरच्या सीरिअल मधून घराघरात पोचलेलं नाव. ही सीरिअल खूप वर्ष पहिल्या स्थानावर होती आणि त्यामुळे अंकीतासुद्धा खूप प्रसिद्धीत राहिली. पण ह्या सीरिअल नंतर मात्र अंकिता कुठे फारशी दिसली नाही. मात्र आयुष्यात आलेल्या चढ उतारांवर मात करत तिने हिंदी चित्रपट सृष्टीत पाऊल टाकलं आहे. तिच्या पहिल्या वहिल्या बॉलिवूड पटात म्हणजे मणिकर्णिका ह्या सिनेमात झलकरी बाई हे पात्र ती साकारत आहे.

चित्रपटाचं ट्रेलर बघता त्यातील सगळ्याच पात्रांची जोरदार चर्चा रंगलेली आहे. ह्या युद्धपटात त्या दोघांची भूमिका लहान असली तरी दमदार असणार. पिरिओडिक सिनेमा असल्याने काही ऍक्शन सीन्स देखील त्यांच्या वाट्याला आले असणार. ह्या दोघांकडून लक्षात राहील अशीच पात्रे साकारली जाणार आहेत हे ओघाने आलेच. तसेही रक्तात अभिनय असलेले मराठी चित्रपटसृष्टीतले दर्जेदार अभिनेते मंडळी हिंदी चित्रपटसृष्टीला कायमच लाभलेले आपण पाहत आलो आहे. त्यामुळे वैभव आणि अंकीतालासुद्धा प्रेक्षक डोक्यावर उचलणार हे नक्की. मणिकर्णिका ह्या चित्रपटाच्या यशासाठी त्यांच्या संपूर्ण टीमला आणि खास करून वैभव आणि अंकिताला फिल्मी भोंगा तर्फे भरपूर शुभेच्छा..!

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना...

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा...

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा ई. ना स्थान नसते. प्रेमापुढे...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व...

About The Author