वैभव तत्ववादी, प्रार्थना बेहेरे आणि नेहा जोशी यांच्या अभिनयाची बहार!

सगळ्यांनाच हवाहवासा ‘रेडीमिक्स’ ८ फेब्रुवारीला चित्रपटगृहात!

‘एव्हीके फिल्म्स’, ‘कृती फिल्म्स’ आणि ‘सोमिल क्रिएशन्स’ प्रथमच एकत्र!

वैभव तत्ववादी, प्रार्थना बेहेरे आणि नेहा जोशी यांच्या अभिनयाची बहार!

प्रस्तुतकर्ते एव्हीके फिल्म्सचे अमेय विनोद खोपकर, वेगळ्या धाटणीचे सिद्धहस्त चित्रपट निर्माते प्रशांत घैसास, मालिका – चित्रपट निर्मितीतले कुशल निर्माते सुनिल वसंत भोसले, ख्यातनाम लेखक शेखर ढवळीकर आणि सर्जनशील दिग्दर्शक जालिंदर कुंभार येत्या ८ फेब्रुवारीला महाराष्ट्रातल्या तमाम रसिकांना ‘रेडीमिक्स’चं वेड लावणार आहेत. एक प्रसन्न, टवटवीत आणि खुसखुशीत लव्हस्टोरीचा हा ‘रेडीमिक्स पॅक’ रसिकांच्या हाती ते सोपवणार आहेत. आजच्या तरुणाईची, सरळ रेषेत नसलेली जीवनरेषा पडद्यावर उत्कंठेसोबतच अत्यंत देखण्या आणि रुचकर पद्धतीने सांगण्यासाठी हे दिग्गज एकत्र आले आहेत. प्रेम करणाऱ्या प्रत्येकालाच फेब्रुवारी महिन्याचे विशेष आकर्षण असते. ही भुरळ घालण्यासाठी यावर्षी खास ‘रेडीमिक्स’ फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे ८ तारखेला रोमँटिक धम्माल करणार आहे.

जालिंदर कुंभार दिग्दर्शित ‘रेडीमिक्स’मध्ये समीर चिटणीस या उमद्या तरुण इंटिरियर डेकोरेटरच्या आयुष्यात वेगळं काही करू पाहणारी नुपूर ही सुंदर तरुणी येते, आणि त्यानंतर त्याचे आयुष्य वेगळेच वळण घेते. इथूनच त्याची रोमांटिक कथा सुरु होते. आजचा आघाडीचा युथ आयकॉन – अर्थात लव्हरबॉय वैभव तत्ववादी आणि प्रार्थना बेहेरे आणि हरहुन्नरी अभिनेत्री नेहा जोशी यांच्या अफलातून अभिनयाचं रसायन नक्कीच प्रफुल्लीत करणारं आहे. त्यांच्या जोडीला अभिनेते सुनिल तावडे, आनंद इंगळे, नेहा शितोळे, गिरीश परदेसी, आशा पाटील, रमा नाडगौडा, अश्विनी कुलकर्णी, उदय नेने, राजू बावडेकर, आशिष गोखले इत्यादी सहकलाकारांनी भरलेले रंग म्हणजे खरंच एक बडा धमाका आहे.

 

READ ALSO :  बॉलिवूड मुळे झाली मराठी चित्रपटांची दैना.. त्यांना कधी थेटर तर कधी जास्ती शोजच मिळेना..

संदिप पाटील यांच्या व्हिजनरी कॅमेऱ्यातून ‘रेडीमिक्स’चं सौंदर्य अधिकच खुललं आहे. चित्रपटात एकूण चार गाणी असून ती गुरु ठाकूर, अश्विनी शेंडे, अभय इनामदार यांनी शब्दबद्ध केली आहेत. त्यावर लोकप्रिय संगीतकार अविनाश–विश्वजित यांनी संगीतसाज चढवला असून हे संगीत प्रेक्षकांवर गारुड घालण्यासाठी सज्ज आहे. आजची लोकप्रिय युवा गायिका आर्या आंबेकर, मुग्धा कऱ्हाडे, शिखा जैन, गायक आशिष शर्मा, फराद भिवंडीवाला, विश्वजित जोशी यांनी स्वरसाज चढवीत माधुर्य वाढविले आहे. कोरिओग्राफर दिपाली विचारे यांनी साजेशी नृत्यरचना केली आहे. संतोष गोठस्कर यांनी वेगवान संकलन केलं आहे तर कार्यकारी निर्मितीची सूत्रे प्रवीण वानखेडे यांनी सांभाळली आहेत. पूजा कामत यांनी केलेल्या वेशभूषेला अनुसरून सुहास गवते यांनी रंगभूषा केली आहे.

‘येरे येरे पैसा’ या सुपरहिट चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या अमेय विनोद खोपकर यांच्या ‘एव्हीके फिल्म्स’ने ‘रेडीमिक्स’ची प्रस्तुती केली आहे तर प्रशांत घैसास यांची ‘कृती फिल्म्स’ ही अनुभवी निर्मिती संस्था रेडीमिक्सच्या निमित्ताने पुन्हा निर्मितीत सक्रीय झाली असून त्यांनी यापूर्वी ‘अनुभूती आर्ट्स’ व ‘कृती फिल्म्स’च्या माध्यमातून ‘रास्ता रोको’, ‘गैर’ आणि ‘साडे माडे तीन’ या सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली आहे. ‘रात्रीस खेळ चाले’, ‘तुझं माझं ब्रेकअप’, ‘गर्ल्स हॉस्टेल’ आणि अमीर खान सोबत ‘तुफान आलंय’ अश्या अल्पावधीतच छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या काळजात घर करून आपलं अढळ स्थान तयार करण्यात यशस्वी झालेल्या सुनील वसंत भोसले यांच्या ‘सोमिल क्रिएशन्स’ने चित्रपट निर्मितीत पहिलं दमदार पाऊल टाकलं आहे. निर्मितीतल्या या दिग्गजांमुळे रसिकांची बक्कळ करमणूक होणार हे नक्की.

‘सावित्रीच्या लेकी’ या वेगळ्या चित्रपटाद्वारे जालिंदर कुंभार यांनी रुपेरी पडद्यावर आपली छाप सोडली होती त्यानंतर मात्र ते छोट्या पडद्यावर सक्रीय होत ‘आयुष्यमान भव:’, ‘कालाय: तस्मैनम:’, ‘मधु इथे आणि चंद्र तिथे’, ‘लज्जा’, ‘अनामिका’, ‘अनुबंध’ ‘का रे दुरावा’, अश्या लोकप्रिय मालिकांच्या लेखन दिग्दर्शनात आपलं वेगळं स्थान सिद्ध केल्यानंतर ते पुन्हा रुपेरी पडद्याकडे वळत त्यांच्या फेवरेट ‘रॉम कॉम’ विषयाचं ‘रेडीमिक्स’ मिक्श्चर घेऊन येत आहेत.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author