तिचं सौंदर्य इतकं लोभस आहे की चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये 5 सेकंदाचं दर्शन सुद्धा चाहत्यांना मोहून टाकतंय.. वाचा ह्या सुंदर अभिनेत्री बद्दल.

एक अतिशय तरुण , सौंदर्याची सगळी विशेषणं तिला लावता येतील, अशी एक मराठी अभिनेत्री मराठी चित्रपटात आपल्याला सध्या पाहायला मिळते आहे. अभिनेत्री पेक्षा सौंदर्यवती म्हणू आपण तिला. कारण ती नुकतीच चित्रपट सृष्टीत आली आहे, अजून तिला तिच्या अभिनयाचे पैलू रसिक प्रेक्षकांना दाखवायचे आहेत. सौंदर्य तिला जन्मजातच आई वडिलांकडून मिळालंय. हंssआई वडील म्हटल्यावर लक्षात आलं, की तिचे आई आणि वडील दोघेही  “वकील” आहेत,  वकिलांची मुलं सहसा अभिनयाकडे वळताना दिसत नाहीत, डॉक्टर बरेच आहेत पण वकील फार नसावेत. आई आणि वडील दोघेही वकील आणि एक भाऊ आहे ह्या अभिनेत्रीला , तो काय करतो?  तोsssss पण ?  तो पण वकीsssल??  हो बाबा होss तो पण वकील आहे.  कमाल आहे बुवा…. तिघं ही वकील… मग ही जी अभिनेत्री आहे, सौंदर्यवती आहे , ती किती शिकलीये? ती मुंबईच्या रुईया कॉलेज मधून बी. ए. झाली आणि पुढे तिनेही Law केलंय. कायssssssssय?? ही पण वकील? एकाच घरातले चार वकील. हो सगळं कुटुंबाच्या कुटुंब वकील, आता बोला. अशी ही वकील कुटुंबातली वकील अभिनेत्री , सौंदर्यवती आहे.

 
 

READ ALSO :  मर्डर पण परफेक्ट असतो बर का..!! आणि तो होणार लवकरच रंगमंचावर..!

आता सौंदर्यवती म्हणलं की ते सौंदर्य डोळ्यात भरून घ्यायला आपण खुर्चीत सावरून बसतो तशी सगळी च्या सगळी पुरुष मंडळी तिचा सिनेमा बघताना तिला डोळ्यात भरून घ्यायचा प्रयत्न करतात बरका. म्हणजे आता तुम्हीच बघा कसली  सुंदर  असणार ती.  मग तिला पाहायचं तर तिचं काय नांव – गांव काहीतरी पाहिजे का नको?  होssहोsहो…आता तेच तर सांगत होतो, पण तुम्हाला दम कुठं निघतोय. ती सौंदर्यवती आहे  “वैदेही परशुरामी” . आत्ता महाराष्ट्रात सगळीकडं गाजतोय ना एक मराठी सिनेमा त्यात तिनं  ‘कांचन’  चा  रोल केलाय. आणि तो सिनेमा कुठला माहितीये का? त्या सिनेमाचं नाव आहे  ” आणि डॉ. काशीनाथ घाणेकर.”  आत्ताचा मराठीतला भारी अभिनेता ‘सुबोध भावे’ बरोबर तिनं ह्या सिनेमात जबरदस्त काम केलं आहे म्हणून हे सगळं सांगायला लागलं. ऐन तारुण्यात असलेली ही कांचन एक रूपवान अभिनेत्याच्या अभिनयावर खुश होऊन त्याच्यासाठी काहीही करायला तयार होते. त्याच्या वयाचा विचार न करता झोकून देते आपलं आयुष्य. असा आहे तो  तिने साकारलेला कांचनचा रोल. लहान वयातली फ्रॉक घालणारी कांचन साडी नेसून  हीरो बरोबर जाते . ह्या सगळ्या प्रसंगातले बारकावे तिने आपल्या अभिनयातून दाखवले आहेत. त्यावेळी तिच्या सौंदर्याची उधळण सुद्धा प्रेक्षकांना घायाळ करते. म्हणून प्रेक्षक तिच्या ह्या छोट्या रोलवर फिदा झालेले आहेत. असंच आहे ह्या अभिनेत्रीचं व्यक्तिमत्व.

ह्याच अभिनेत्रीने हिंदीत एका ‘वजीर’ नावाच्या चित्रपटात काम केलं आहे. तिच्या ह्या चित्रपटातल्या भूमिकांना तिने सुरुवात केली २०१० साली.  “वेड लावी  जीवा” हा तिचा पहिला मराठी चित्रपट, त्यानंतर तिने हिंदी   “वजीर” ह्या चित्रपटात काम केलं. आत्ता ती झळकते आहे “आणि डॉ. काशीनाथ घाणेकर” ह्या सिनेमात आणि पुढचा तिचा हिंदी सिनेमा लवकरच रिलीज होतोय तो म्हणजे “सिम्बा” . सिम्बाच्या छोटयाशा  टीजर मधून वैदेही २ सेकंद दिसते आहे पण तिचे चाहते डोळे मोठे करून तो टीजर बघतायत, कारण रणवीरसिंग आहे ह्या सिम्बाचा नायक,  म्हणून त्यांना उत्सुकता आहे की वैदेही चा काय रोल असेल आणि ती कशी दिसत असेल? अशी ही एक “ब्यूटी फुल” ‘गर्ल’ आता तिच्या मराठी आणि हिंदी सिनेमात आपली कशी  छाप पडते ते पाहायला सगळेच तयार असतील. कारण हेच आहे ते स्त्री  व्यतिमत्व , जिला पाहताच तिचे चाहते घायाळ होतात. फिदा आहेत तिच्या सौंदर्यावर. लवकरच येतेय ती पुन्हा तुमच्या भेटीला.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...