स्पृहाच्या नवऱ्याचे मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण

मराठी चित्रपटसृष्टीवर आपल्या निखळ हसण्याने जादू करणारी आणि तिच्या लेखणीने सर्वाना भुलवणारी, तिच्या अभिनयाची जादू प्रेक्षकांवर सदैव तरळू देणारी स्पृहा, स्पृहाच्या पावलावर पाउल ठेवत तिचा पती सुद्धा मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण करत आहे. स्पृहा सध्या कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ या संगीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. बर्याच दिवसांनी स्पृहा आपल्या भेठीस आली या कार्क्रमाद्वारे. स्पृहाचा लवकरच ‘होम स्वीट होम’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात तिचा नवरा वरद लघाटे दिसणार आहे. ‘इकडून तिकडे’ या गाण्यात तो दिसणार आहे. या गाण्यातून वरद मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. नुकतच हे गाणं युट्यूबवर रिलीज करण्यात आलं आहे. या गाण्यात वरदची एक छोटीशी भूमिका आहे. तो पाहुणा कलाकार म्हणून या गाण्यात आहे. या गाण्याद्वारे वरद्चे मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण झाले आहे. स्पृहा हि अजय अतुल यांच्या गाण्याची तसेच संगीताची चाहती आहे. त्यांच्या एखाद्यातरी गाण्यात तिला अभिनय करायला मिळावा अशी तिची इच्छा होती ती या गाण्यामुळे पूर्ण झाली आहे. हे गाणे युट्यूबवर धमाल करते आहे. स्पृहाच्या सोशल मिडीयाच्या घडामोडीनुसार ती मुळात या चित्रपटाबद्दल खूप उत्साही आहे असे दिसून येते. हे संपूर्ण गाणे स्पृहावर चित्रित झाले आहे. खूप धमाल गाणे आहे. कोणत्याही व्यक्तीची एक छोटीशी इच्छा असते कि त्याचे आयुष्यात एक छोटेसे घर असावे प्रत्येक व्यक्तीप्रमाणे त्याची त्याच्या घराबाबतची कल्पना बदलता जाते. काहीशा अशा अनुषंगाने हा चित्रपट आहे. चित्रपटाचे शीर्षक बरेच काही सांगून जाते.

READ ALSO: होम स्वीट होम’ चा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा संपन्न

‘होम स्वीट होम’ची कथा हृषिकेश जोशी, वैभव जोशी, मुग्धा गोडबोले यांची आहे. संगीतकार नरेंद्र भिडे, संतोष मुळेकर यांनी कवी, गीतकार वैभव जोशी यांच्या गीतांना स्वरबद्ध केलं आहे. अजय गोगावले यांच्या आवाजातील ‘इकडून तिकडे तिकडून तिकडे’ हे गीत लक्ष वेधून घेते. तर सचिन पिळगांवकर यांच्या आवाजात ‘हाय काय नाय काय’ ऐकायला धमाल येते. घराविषयीची प्रत्येकाची व्याख्या वेगळी असली तरी घर हे प्रत्येकाला हवं असतं. आणि सर्वांचं आपलं घर हे ‘होम स्वीट होम’ असतं, असं सांगणारा ‘होम स्वीट होम’ येत्या २८ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

तर एका छोट्याशा घरासाठी नक्की पहा ‘होम स्वीट होम’

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना...

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा...

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा ई. ना स्थान नसते. प्रेमापुढे...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व...

About The Author