वर्षा उसगावकर कोंकणी चित्रपटात

आपल्या दमदार अभिनयाने 90 चे दशक गाजविणारी एक अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगावकर. सवत माझी लाडकी, लपंडाव, गम्मत जम्मत अशा विनोदी चित्रपटांतून त्यांनी रसिकांच्या मनात स्थान मिळविले. लवकरच ह्या अभिनेत्री आपल्या मातृभाषेत म्हणजेच कोंकणी मध्ये काम करताना दिसतील. नुकत्याच झालेल्या घोषणेनुसार वर्षा उसगावकर लवकरच कोंकणी सिनेमात पदार्पण करणार आहेत.

वर्षा उसगावकर या मूळच्या गोव्याच्या आहेत. त्यांना लहानपणापासून अभिनयाची आवड होती. पण अभिनयाच्या फारश्या संधी त्या वेळी उपलब्ध झाल्या नाहीत. त्यांनी ब्रह्मचारी या नाटकात प्रमुख भूमिका केली. त्यांचे हे नाटक अत्यंत गाजले. त्यांना त्या वेळी म्हणजेच 1987 मध्ये गम्मत जम्मत या चित्रपटात अभिनय करण्याची संधी मिळाली. आणि अर्थातच त्यांनी या संधीचे सोने केले. त्यांना यानंतर अनेक संधी मिळत गेल्या आणि त्यांनीही अनेक दर्जेदार चित्रपटात काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. मराठीत हमाल दे धमाल, सवत माझी लाडकी, शेजारी शेजारी, अफलातून, एक होता विदूषक, भुताचा भाऊ असे त्यांचे चित्रपट चांगलेच गाजले. एक युवती, एक प्रेयसी, एक तडफदार व्यक्तिमत्त्व असे त्यांच्या अभिनयाचे विविध पैलू त्यांच्या भूमिकांमध्ये दिसून आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी हिंदी सिनेमावर ही आपली मोहोर उमटवली. हिंदीत त्यांनी इंसानियत, दूध का कर्ज़, शिकारी, साथी, हफ्ता बंद, घरजमाई, दिलवाले कभी न हारे असे अनेक चित्रपट गाजविले. अलीकडेच त्यांनी राजस्थानी चित्रपटातही काम केले.

2016 साली कंगना या राजस्थानी चित्रपटात त्यांनी एक भूमिका साकारली होती. या व्यतिरिक्त त्यांनी एका बंगाली चित्रपटात ही काम केले आहे. युवा वर्गाच्या हृदयातील ताईत बनलेल्या दुनियादारी या चित्रपटातही त्यांनी एक महत्त्वाची भूमिका साकारली. वर्षा उसगावकर जी या नेहमीच काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असतात. एकाच प्रकारच्या भूमिका करण्यापेक्षा त्यांचा भर नवनवीन प्रयोग करण्यावर असतो.

आता त्या आपल्याला कोंकणी चित्रपटातही दिसतील. लवकरच त्यांचा जांवय नंबर वन हा चित्रपट आपल्या भेटीला येईल. या चित्रपटाचं दिग्दर्शन हॅरी फेर्नांडिस यांनी केलं आहे. या चित्रपटात आपल्याला सासू आणि जावई यांच्या नात्यातली धमाल बघता येईल. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील वर्षा उसगावकर जींच्या चाहत्यांना या चित्रपटाची फारच उत्सुकता लागून राहिली आहे . ही अष्टपैलू अभिनेत्री कोंकणी चित्रपट सृष्टीही गाजवले यात काहीच शंका नाही.