लागीरंचा विक्या… आता येणार सलीम शेखच्या भूमिकेतून…!

मनोरंजनाच्या रणांगणात निखिलची आणखी एक वेबसिरीज वीरगती

वेब च्या रणांगणात निखिलची बाजी

देशभक्तीने नुसतंच भारावून न जाता हाती तिरंगा घेऊन वीरगती पत्करणाऱ्या झी मराठीवरील ‘लागीरं झालं जी’ मालिकेमधील ‘फौजी विक्रम’च्या व्यक्तिरेखेला संपूर्ण महाराष्ट्राने प्रचंड लोकप्रियता दिली. फौजी विक्रम उर्फ विक्या उर्फ निखिल चव्हाण या गुणी कलावंताचा सुरु झालेला अभिनयक्षेत्रातील हा प्रवास त्याने साकारलेल्या भूमिकेइतकाच रोमांचकारी आहे. अनेकविध नाटक, मालिका आणि चित्रपटांतून आपल्या भेटीस आलेला निखिल प्रत्येक भूमिकेत समरस होताना दिसतो. अलीकडे आलेल्या त्याच्या ‘स्त्रीलिंग पुल्लिंगी’ या वेबसिरीजची चर्चा सध्या चांगलीच रंगली असताना, त्याची आणखी एक वेब फिल्म लवकरच आपल्या भेटीस येणार आहे. झी ५ ओरिजनल प्रस्तुत ‘वीरगती’ या सत्यकथेवर आधारित वेब फिल्म मधून निखिल आपल्याला एका आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे.

 

READ ALSO :  मराठी ताऱ्यांचे ‘कृष्णधवल’ फोटोशूट…!

अभिराम भडकमकर ह्यांची गोष्ट आहे तर इर्फान मुजावर आणि ऋषिकेश तुराई चे संवाद लेखन आहे, राजू देसाई आणि विशाल देसाई दिग्दर्शित ही वेब फिल्म प्रजासत्ताकदिनी म्हणजेच २६ जानेवारीला ‘वीरगती’ प्रेक्षकांना पाहता येईल. निखिलने आजवर साकारलेल्या भूमिकांमध्ये आपलं सर्वस्व झोकून देऊन काम केलं. भूमिकेची लांबी ना मोजता भूमिकेची खोली जाणून घेतली म्हणूनच त्याने साकारलेल्या छोट्या-छोट्या भूमिकाही विशेष लक्षणीय ठरल्या. नाटक, मालिका, चित्रपट, वेबसिरीज असा चौफेर वावर असणाऱ्या निखिलला झी ५ ओरिजनल फिल्म्सद्वारा एक सुवर्णसंधी चालून आली ती म्हणजे ‘वीरगती’तील आर्मी ऑफिसर ‘लेफ्टनंट सलीम शेख’ या व्यक्तिरेखेद्वारा. या वेब फिल्म मध्ये निखिल मुख्य भूमिकेत दिसणार असून आर्मी ऑफिसर ‘ सलीम शेख’ ला सुद्धा केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण भारतातून उदंड प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे.

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना...

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा...

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा ई. ना स्थान नसते. प्रेमापुढे...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व...

About The Author