अभिनयातले वाघ ‘वाघेऱ्या’ गावात

“या चित्रपटात निखळ मनोरंजनाद्वारे सामाजिक प्रबोधन करण्याचाही प्रयत्न आहे, तसेच हा चित्रपट सद्यस्थितीतील घटनांवर भाष्य करणारा असल्यानं प्रेक्षकांना तो नक्की भावेल, असा विश्वास निर्माते राहुल शिंदे यांनी व्यक्त केलेला आहे.

अभिनयातले वाघ ‘वाघेऱ्या’ गावात

गावात शिरलेला वाघ दिसो न दिसो… पण ‘वाघेऱ्या’ या चित्रपटात अभिनयातले मातब्बर ‘वाघ’ रसिक प्रेक्षकांना नक्की पाहायला मिळणार आहेत. किशोर कदम, भारत गणेशपुरे, ऋषिकेश जोशी, सुहास पळशीकर, लीना भागवत, छाया कदम, नंदकिशोर चौगुले यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांची फौज घेऊन, मनोरंजनाचा खजाना लुटून, तो प्रेक्षकांच्या हवाली करण्यासाठी दिग्दर्शक समीर आशा पाटील सज्ज झालेले आहेत. प्रत्येक गोष्ट रेटून बोलणारे ‘आण्णा’, सख्खी बायको ज्यांची किंमत करत नाही असे गावचे ‘सरपंच’, नवीनच झालेल्या लग्नानंतर बायकोला पकडण्याऐवजी वाघ पकडायला निघालेले ‘फॉरेस्ट ऑफिसर’ अशा एकाहून एक सरस पात्रांची धमाल असणारा हा चित्रपट आपल्या भेटीला येत आहे १८ मे २०१८ ला.

या चित्रपटाची सतराव्या ‘आंतरराष्ट्रीय मुंबई फिल्म फेस्टिव्हल’ साठी निवड करण्यात आली होती. तसेच ५३ व्या राज्यशासन पुरस्कारामध्ये ‘सर्वोत्तम विनोदी- अभिनेता भारत गणेशपुरे’ हे नामांकन हि मिळालं होतं. चित्रपटाच्या ट्रेलरवरून हा चित्रपट धमाल विनोदी आहे हे चाणाक्ष प्रेक्षकांच्या लक्षात आलं असेलंच.. पण हा चित्रपट नाशिक जिल्ह्यातील मावडी या गावात घडलेल्या सत्य घटनेवर आधारित आहे, यामुळे हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता अजूनच वाढते. हा चित्रपट राज्य सरकारच्या ‘वाघ वाचवा’ या योजनेचा पुरस्कर्ता आहे.

सुप्रीम मोशन पिक्चर्सचे लालासाहेब शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांची प्रस्तुती असलेला आणि गौरमा मीडिया अँड एंटरटेंटमेंट प्रा. लि. आणि वसुधा फिल्म प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन समीर आशा पाटील यांनी केलेलं आहे.. राहुल शिंदे आणि केतन माडीवाले हे या चित्रपटाच्या निर्मितीच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. हा चित्रपट आर्थिक अडचणींमुळे काही काळ बंद पेटीत होता पण विनोदाच्या वादळाला रोखणं demonitisationला शक्य झाल्याचं दिसत नाही… कारण येत्या शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित होतोय.. त्याच डौलात, त्याच टेचात.

‘सांभाळून या राव, येडं झालंय गाव’ अशी टॅगलाईन असलेला चित्रपट गावरान मेजवानी तर देणारंच, पण सोबतच विनोदाची आतिषबाजी हि घडवणार यात कोणताही वाद नाही. चित्रपटामधील गाणी सुद्धा फर्मास झालेली आहेत. मनोरंजन विश्वामधील अशाच ताज्या घडामोडींसाठी फिल्मीभोंगाला भेट देत रहा. खुश रहा..फिल्मी रहा.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author

Filmi Shinde

कथा, पटकथा, संवाद या तिन्ही विभागात प्राविण्य मिळवलेले सुशांत शिंदे सध्या चित्रपटलेखन, मालिकालेखन आणि डिजीटल क्षेत्रासाठी काम करत आहेत. सुशांत शिंदे याचं लेखन प्रेक्षकांना हास्य, रहस्य आणि नाट्य याच्या अद्भुत मिश्रणाने खिळवून ठेवतं. फिल्मी भोंगा या वेब पोर्टल साठी ते 'फिल्मी शिंदे' या नावाने ब्लॉग लिहितात.