लग्नाचं निमंत्रण तुम्हाला पण आहे बरं का?
“आमच्या मामाच्या लग्नाला यायचं हंss.”

आवरा… झाली का तयारी? चला लवकर उशीर व्हायला नको. वन्स वन्स मला सांगा ना मी साडी कुठली नेसू, ही फुला फुलाची नेसू का ही काठा पदराची? तू असं कर आतून फुला फुलाची नेस आणि वरतून काठा पदराची. पण आवर लवकर. आवरा, आवरा म्हणून बाप्पाची घाई. काशी मावशी काकाला ओरडून विचारतीये आहोsss तुमची धोतरं घेतली का? विसरलात तर काय व्हईल? आधी घ्या ती, नाई तर माझ्या डोक्याला द्याल ताप. मधेच आवराsss….भरली का ट्रंक, लागतंय का तिचं झाकण? उभा रहा त्या झाकणावर. तुटली का कडी? आता काय? बांध दोरी त्या ट्रंक ला आता काय करणार? आवराs..

अशी असती सगळी लगीन घाई. सगळे आपल्या आपल्या नादात. लग्न म्हटलं की सगळं वऱ्हाड च्या वऱ्हाड ह्या गावातून त्या गावाला जाणार मग तयारी करायला किती दिवस लागणार? तरी शेवटी काहीतरी विसरतंच. आणि होतो सगळं गोंधळ. म्हणून चार सहा लग्नाचा एक्सपिरिअन्स असलेल्या लोकांना लग्न ठरवण्या पासून ते पार वरात घरात पोचेपर्यंत मध्यस्थ म्हणून बोलवायला लागतं ते जसं सांगतील तसं ऐकायला लागतं, तेंव्हा कुठं तो लग्न सोहळा निर्विघ्न पार पाडतो. आता फक्त महाराष्ट्रच पहिला तर प्रत्येक समाजातली लग्नाची पद्धत वेगळी वेगळी. एका गावात एक तर दुसऱ्या गावात काहीतरी फरक असतोच. मग काही ठिकाणी प्रतिष्ठा महत्वाची, तर काही ठिकाणी लग्नाची ठराविक प्रथा महत्वाची असते. मग काही काही लग्नात तर बऱ्याच गमती जमती घडतात. त्या कशा घडतात? कुणाची काय धावपळ उडते, कोण रंगात, तर कोण रागात, कुणाला रुसायला तर कुणाला फुगायला हीच वेळ बारी वाटते. कोणी असतं खूप आनंदात तर कोण बसतं ताटकळत. लहान पोरांना क्रिकेटचं ग्राउंड वाटतो तो हॉल, तर कुणी खेळतं शिवा शिविचा खेळ, पण सोहळा एकदाचा पार पाडतो. रंगतदार सोहळा म्हणजे एखाद्या नात्यातल्या व्यक्तीचं लग्न. महिना दोन महिने जातात तयारीला आणि नंतर चे महिना दोन महिने ते सगळं निस्तरायला, म्हणजे जिकडचं तिकडं मांडायला. पण असते सगळी मजाच मजा.

 

READ ALSO :  उपेंद्र लिमये ‘सूर सपाटा’ मध्ये साकारणार गावठी कबड्डी प्रशिक्षक

हीच सगळी लग्नाची मज्या जर आपल्याला मोठ्या पडद्यावर मराठमोळ्या ढंगात पाहायला मिळाली तर ते तीन तास कुठे जातील ते कळायचं नाही. म्हणजे ‘Wedding चा शिनेमा’. असली अफलातून आयडिया कधी सुचली नव्हती कुणाला. हा ‘वेडिंग चा शिनेमा’ लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक मराठी गीतकार, संगीतकार, गायक, परीक्षक म्हणून सगळ्यांनाच माहिती असलेलं, गाजलेलं नाव म्हणजे ‘सलील कुलकर्णी’. ह्यांच्या डोक्यातली ही कल्पना ते स्वतःच लेखक, पटकथा लेखक संगीतकार आणि दिग्दर्शक सुद्धा तेच, त्यामुळे त्यांना जसा पाहिजे तसा हा सिनेमा तयार झाला असणार.असा हा हलका फुलका चित्रपट पाहायला मजाच येणार ह्यात शंका नाही. ह्यात कोण कोण काम करणार आहे हे अजून कळायचं आहे कारण आत्ता फक्त टीझर आलाय. पण थिएटर मध्ये वऱ्हाडाबरोबर बघू की हा चित्रपट, म्हणजे जास्त धमाल येईल ना? हा ‘वेडिंग चा शिनेमा’ १२ एप्रिल २०१९ ह्या दिवशी सगळीकडे प्रदर्शित होणार आहे हे लक्षातच ठेवा.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...