ईशा अंबानी आणि आनंद पिरामल ह्यांच्या लग्ना आधीच्या संगीत कार्यक्रमात काय घडलं?

ईशा अंबानी आणि आनंद पिरामल ह्यांच्या लग्ना आधीच्या संगीत कार्यक्रमात काय घडलं?

इशानंदच्या लग्नाची जोरदार तयारी झाली आणि ते दणक्यात साजरं होतंय. ही माहिती मीडिया वाले आपल्याला सतत देत असतात. सध्या अंबानींची कन्या ईशा आणि पिरामल यांचे सुपुत्र आनंद ह्यांच्या मोठ्या लग्नाच्या तयारीच्याही बातम्या कळत होत्या. ह्या मोठ्या लग्नाचे पाहूणेही मोठेच की. मोठमोठ्या कंपन्यांचे मान्यवर, बॉलीवूड सेलिब्रिटी, असे मोठे प्रस्थ. ह्या लग्नाच्या आधी रितिरिवाजप्रमाणे एक संगीताचा कार्यक्रम ठेवण्याची प्रथा आपल्या हिंदुस्थानात आहे. अंबानींच्याकडेही  असाच कार्यक्रम मोठ्या धूम धडाक्यात साजरा झाला आणि त्यात बऱ्याच गमती जमती झाल्या. ह्या कार्यक्रमाचे ‘घरची चूल बंद‘ चे निमंत्रण अख्या बॉलीवूडला असणार. कारण सिने जगतातली नामवंत मंडळी ह्या कार्यक्रमाला हजेरी लावत आहेत . ‘बच्चन’ कुटुंबीय तर हमखास असतातच. कारण त्यांचा तर घरोबा आहे. अभिषेक बच्चन , ऐश्वर्या राय सुद्धा हजर होते.

संगीताचा कार्यक्रम आणि सगळे नामवंत सेलिब्रिटी, मग गाण्याबरोबर नुसत्या माना थोडीच डोलवणार? ह्या सगळ्यांनाच डान्स येतो. मग गाण्याबरोबर डान्स सुद्धा सुरू झाला. जशी जशी गाण्याची झिंग वाढत जाते तशी तशी नाचाची लय अंगात भरायला लागते. आणि मग काय ‘ एक के बाद एक ‘ जलवे दिसायला लागतात. प्रत्येक अभिनेत्री बरोबर आवडता अभिनेता डान्स करतो. आणि मग कार्यक्रमाची रंगत वाढत जाते. इथे तर अवघे बॉलीवूड लोटले होते. मग तर आनंदी आनंदच की.सगळ्यांची कोणा कोणा बरोबर  डान्स परफॉर्म करायची इच्छा असते त्याप्रमाणे केला जातो . ह्या कार्यक्रमात सामोरा समोर आले अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर. 

 
 

READ ALSO : गोंडस चेहरा असूनही खलनायकी रूपातच का आवडतोय जितेंद्र जोशी?

कपूर घराणं आणि बच्चन घराणं ह्यांची दोस्ती पूर्वीपासून आहे हे सगळ्यांना माहितीच आहे. ह्या दोस्तीचं रूपांतर नात्यात व्हावे म्हणून दोन्ही घरात चर्चा ही झाल्या होत्या. करिश्मा आणि अभिषेक यांच्या लग्नाबद्दल. ही गोष्ट २००२ सालातली. पण त्यावेळी अचानक ही बोलणी सकारात्मक झाली नाही. आणि दोघांनी आपलं नातं संपुष्टात आणलं. दोन्ही परिवारामध्ये अवघड परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा पासून करिश्मा अभिषेक ना चित्रपपत केले ना कधी ते एकमेकांसमोर आले. अभिषेकशी नातं तोडून पुढच्या वर्षी २००३ मध्ये करिश्मा एका मोठ्या बिझन्समनशी विवाहबद्ध झाली सुद्धा. त्याचं  नाव संजय कपूर. हा विवाह फार काळ टिकला नाही. दोन मुलांची आई झाल्यावर सुद्धा करिश्माने संजय कापूरशी २०१० साली फारकत घेतली. अभिषेक आणि ऐश्वर्या हेही दोघे नंतर आनंदाने विवाहबद्ध झाले. आणि त्यांची गोष्ट तर एखाद्या परिकथेप्रमाणे रंगतदार होती. अजूनही ती परीकथा सुरूच आहे.

तर गम्मत अशी की करिश्मा अंबानींच्या ह्या कार्यक्रमात आवर्जून आली होती. आणि तिने सगळ्या बॉलीवूड सेलिब्रिटींसमोर अभिषेक बच्चनचा हात धरून एकाच छता खाली ऐश्वर्या सह एका गाण्यावर डान्स केला. पण….. गाणे संपल्यावर मात्र कपूर आणि बच्चन कुटुंबियांची तशीच अवघड परिस्थिती झाली , जशी त्या दोघांचे लग्न न झाल्यामुळे झाली होती अगदी तशीच. अचानक जुने प्रेम अंगलट आल्यावर त्याव्ह करिश्मा चालतो की नाही हे अभिषेकलाच माहिती. तूर्तास अभिषेक आणि ऐश्वर्या आपल्या छोट्या आराध्या बरोबर स्वप्न संसारात सुखी आहेत आणि पुढेही राहावेत अशी सदिच्छा आपण व्यक्त करूया. अहो बॉलीवूड मध्ये कधी, काय, कसं घडेल हे सांगता येणे कठीण. पण अंबानींच्या ईशाच्या लग्नाच्या संगीत कार्यक्रमात हा बाका प्रसंग घडला आणि ऐश्वर्या अभिषेक यांच्या चाहत्यांचे धाबे तर नक्कीच दणाणले असणार..!

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author