आपली आर्ची सध्या काय करतेय..?

आपली आर्ची सध्या काय करतेय..?

सैराट ह्या सुपरहिट चित्रपटातून परश्या आणि आर्ची घराघरात पोहोचले. अस्सल गावरान सौन्दर्य म्हणू शकू असाच गोड लोभस चेहरा असणारी आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू एक रात्रीत स्टार झाली ते तिच्या सहज अभिनयाच्या जोरावर. 

सैराट सिनेमात गावाकडचा खास हेल असलेली मराठी भाषा वापरण्यात आली होती. रिंकूला अगदी सहजपणे त्या भाषेचा वापर करता आला आणि त्या भाषेचा गोडवा अख्या महाराष्ट्राने पसंत केला. आर्ची आणि परश्याची म्हणजे रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसरची जोडी सगळ्यांनाच खूप आवडली. पाहता पाहता सैराट सिनेमाने एखाद्या बॉलिवूडच्या हिंदी सिनेमा प्रमाणे रोकॉर्डतोड कमाई केली. 

सैराट चा हिंदी रिमेक म्हणजेच धडक हा सिनेमा आपण सगळ्यांनी पहिलाच असेल पण एकेकाळची अभिनयाची साम्राज्ञी असलेल्या श्रीदेवीची मुलगी आर्ची च्या बॉलिवूड वेशात फार काही कोणाला आवडली नाही. खूप तुलना केली गेली आणि शेवटी चाहत्यांच्या प्रेमाच्या पारड्यात रिंकुचेच पारडे जड ठरले. 

 
 

READ ALSO : जाणून घ्या किती मानधन घेतात हे नामवंत मराठी अभिनेते आणि अभिनेत्री?

पण ऑफबीट सिनेमात काम केल्यावर पुढे काय? असा प्रश्न सगळ्या कलाकारांसमोर उभा राहतो. 

त्यातून रिंकू सैराटच्या सुमारास फक्त दहावीत होती. म्हणजे वय अगदीच कमी. त्यामुळे सिनेमात करियर करायला स्वप्ननगरी मुंबईत येऊन राहण्याची परवानगी पण घरून मिळणे कठीणच. मग फक्त आयुष्यभर एकाच सिनेमात काम करून प्रसिद्धी मिळवून सिनेसृष्टीतून गायब होणे आणि ‘वन फिल्म वंडर’ बनून लोकांच्या विस्मृतीत जाणे इतकाच काय ते हातात उरतं. 

रिंकू मात्र ह्या मनस्थितीत नक्कीच दिसत नाही. तिने अभ्यास करून दहावीही उत्तीर्ण केलीये आणि पुढे सिनेमात करियर करण्याची उच्च व्यक्त केलीये. दक्षिणी भाषेत सैराट चा रिमेक सुद्धा तिने साकारला. 

तिला मिळतील तितक्या जाहिराती करून लोकांच्या नजरेसमोर राहायचा प्रयत्न सुरू केला. महिलांच्या पाळीसाठी लागणाऱ्या ‘सॅनिटरी टॅम्पोन’ सारखी आधुनिक जाहिरात सुद्धा तिने केलीये. 

आता चर्चा आहे ती तिच्या मेक ओव्हर ची. कोणत्याही सिनेमाच्या मुख्य प्रवाहात येण्याकरता हे सगळ्याच अभिनेत्यांना गरजेचं असतं. भाषेचा लहेजा हा त्या त्या सिनेमा प्रमाणे बदलत येणे गरजेचे असते. एकाच एक हेल असणे घातकच. आणि अगदीच साधी राहणी आणि चाहत्यांच्या नजरेआड होणे हे ही करियर च्या दृष्टीने योग्य नाही. ह्याची जाणीव रिंकुला झालेली आहे. 

तिने नुकतेच एक फोटोसेशन करवून तिच्या मध्ये झालेल्या आमूलाग्र बदलाची चुणूक सगळ्यांना दाखवून दिली आहे. मराठी मातीतला लुक तर तिच्यावर खुळूनच दिसतो पण आता मॉडर्न कपड्यात, भारतीय आणि वेस्टर्न कपड्यातही रिंकू खूपच सुंदर वाटत आहे. स्वतःच्या भाषेवर पण ती मेहनत घेत आहे जेणे करून तिला कोणत्याही लहेजा असलेल्या भाषेतील सिनेमे करायला अडचण येऊ नये. 

तिने नुकतीच मराठी नाटकांमध्ये सुद्धा काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तिला मराठी थेटर बद्दल फारशी माहिती नाही असेही तिने सांगितले. पण त्या बद्दल सगळी माहिती मिळवून तिलाही मराठी नाटके करायची आहेत. सिनेमा पेक्षा खाशी झिंग असणारी नाटके आणि त्याच्यातला नशा तिला अनुभवायचा आहे. प्रेक्षकांकडून समोरासमोर मिळणारी वाहवा तिलाही हवी आहे. 

अशा प्रयत्नशील अभिनेत्रीचा आता कागर नावाचा सिनेमाही आपल्या भेटीला येणार आहे. एक सिनेमाचं अफाट मिळालेलं यश कोणाच्याही डोक्यात जाऊ शकतं पण ते ना होऊ देता. शिकण्याची उर्मी मनाशी बाळगून यशाच्या एकेक पायऱ्या वर चढायची इच्छा असलेली ही गुणी अभिनेत्री पुढच्या काळात ह्या सिनेसृष्टीत आपला जम बसवेल असे वाटते. स्वतःच्या आत्मविश्वासावर तिने पाऊल पुढे टाकलेत आहे. तिला पुढे सैराट पेक्षा ही जास्ती यश मिळत जावो ही सदिच्छा..!

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author