काय वेगळेपण आले मुंबई पुणे मुंबई 3 मध्ये

केशरी फेटे, ढोल आणि ताशे म्हणजे पुण्याची शान झालीये……पण ह्याच पुण्यात मुंबई अवतरली. आणि पुणे आणि मुंबई दोघांची ढोलावर थाप. आली ठुमकत नार लचकंत मान मुरडत हिरव्या रानी.

आत्ताची पुण्यातली तरुण पिढी कितीही बिझी असली तरी ढोल ताशे वाजवण्यात अगदी पटाईत. मुलीसुद्धा ढोल बांधून वाजवायला कमी नाहीत. मग  मुंबईची लेक पुण्यात दिल्यावर मागे कशी राहील?

मुंबई  तिच्या रंगीत फॅशन डिझाईनमध्ये बिझी आणि पुणे संगीत स्टुडिओत बिझी. संध्याकाळी ऑनलाइन पिझ्झा मागवायचा आणि दोघांनी मिळून कालच्या उरलेल्या चिकनवर ताव मारायचा, साथीला थोडी बिअर. “असं घरात बसून सगळं मनासारखं मिळायला नशीब लागतं” तृप्त ढेकर देऊन दोघांनी झोपी जायचं आणि सकाळी गजर लावूनसुद्धा काट्यावरच उठायचं.

आधी अंघोळ कोण करणार तर पुरुष आळशी असल्यामुळे बायकोचा नं १. सकाळचा वेळ पुरत नाही म्हणून नवरा बिचारा फक्त डिओ मारून कामाला. त्यात गाडीची काल ठेवलेली चावी कुठे ठेवली होती ते आज कसं आठवणार? घरात कुठे काय ठेवलंय हे बायका कितीही बिझी असल्या तरी कसं काय लक्षात ठेवतात देव जाणे. पण नुसतं गाडीची चावी म्हणायच्या आत त्या चावीचा पत्ता लागतो. ह्या गडबडीत दारावरची बेल वाजली तर दार कोण उघडायला जाणार?  शेवटी बायकाच थोडं नमतं घेऊन दार उघडतात. ह्यात कोणी कितीवेळा दार उघडलं ह्याचं तेच दोघं अकाउंट ठेवतात. त्यात नेहमी बायकोच जास्तवेळा दार उघडते हे अकाउंट ठेवल्यामुळे कळतं.

ह्यांच्या वेडिंग ऍनिव्हर्सरीची आठवण दुसराच करून देतो. पण ह्याचं सगळं त्यांनी ठरवलेल्या प्लॅन प्रमाणेच चालत असतं . दूरदृष्टी ठेऊन केलेलं प्लॅनिंग. म्हणजे निदान चार वर्षे तरी आपल्याला मूल नको. पण हे सगळं मुंबई आणि पुणेच ठरवतात. बाकी पण नाती असतात आणि त्यांचाही आपल्या निर्णयात सहभाग असतो हे लक्षात येण्याची मॅच्युरिटी त्यांना लगेच कशी काय येणार? समोरच्याच फ्लॅटमध्ये आई, वडील आणि आज्जी सुद्धा राहतात हे सकाळ संध्याकाळच्या एकमेकांवर नितांत प्रेम करण्याच्या नादात लक्षात नाही येत. अधेमधे तेच बिचारे ह्यांच्या संसारातला कचरा साफ करतात. घराची साफसफाई ठेवतात पण सगळं कसं अगदी प्रेमानं. मग आता मला सांगा ” सुख म्हणजे sssssनक्की ssकाय असतं”?

 
 

READ ALSO : जाणून घ्या किती मानधन घेतात हे नामवंत मराठी अभिनेते आणि अभिनेत्री?

ह्या सुखात एक शॉक बसतो. सिंहगडावरून उतरत असताना “कुणी तरी येणार गं पाहूणा” हा पाहुणा आपण येत असल्याची जाणीव करून देतो, आणि टेस्ट पॉझिटिव्ह असल्याचं कळतं. पण हे कोणालाही कळू द्यायचं नाही असं ठरतं.

प्लॅनिंग प्रमाणे अजून चार वर्षे विचारच नाही करायचा. पण ही बातमी बी बी सी वरून पसरते. आणि पुणे आणि मुंबईला  आश्चर्याचे गोड गोड धक्के बसायला लागतात. पण ते दोघे आपल्या प्लॅनिंगवर ठाम.   मग ह्याच्यावरून वातावरण जरा तापलं तर तो एक प्रत्येक जोडप्याच्या आयुष्यात येणारा  उन्हाळा समजावा, कारण त्यानंतर ‘नेमेची येतो मग पावसाळा’. तरीसुद्धा संसार सुखाचा व्हावा असं वाटत असेल तर फक्त आपलं करिअर, आपले गोल्स, ह्याचाच हट्ट धरून नाही चालणार.  टीम तयार करावी लागते आणि टीममध्ये निदान आपले सगळे यायला पाहिजेत कारण आपल्याला घडवण्यात तेपण असतातच ना? मग मुंबईचे आई बाबा आणि पुण्याचे आई बाबा आज्जीसह पाहीजेतच की. कारण संसार तर करायचाय पण मोठी जबाबदारी घ्यायची भीती वाटते म्हणजे मुंबईला आईचा रोल झेपेल का? आणि पुणे चांगल्या बाबाचा रोल करू शकेल का? सगळं कसं सुखात चाललं पाहिजे. पुन्हा एकदा….मला सांगा….सुख म्हणजेsssssनक्कीsss काय असतं?

पुरुषांना भरपूर पैसे कमवून बायकोला सुखात ठेवायचं असतं, पण बायकोला सगळ्यांनाच सुखी ठेवायचं असतं, मग जबाबदारी पण आलीच की.कधी कधी करिअरला बाजूला ठेऊन स्वीकारायची असते जबाबदारी कारण आपला जोडीदार आपल्याला निश्चितच साथ देणार ह्याची खात्री असते.

तेवढ्यात डॉ. शुभा मावशी घेऊन येतात टेस्ट रिपोर्ट. सगळं घर टेन्शनमध्ये. काय असतो हा रिपोर्ट ?  हा आहे प्रेक्षकांना शॉक म्हणून तो थिएटरमध्येच बसलेला बरा.

सगळं काही सुशेगात चालले तर तो संसार एकाच चवीचा राहील, त्यात तिखट पाहिजे, मीठ सुद्धा असायलाच पाहिजे , गोडवा आतापर्यंत होताच की.

सगळ्या चवींनी युक्त आहे हा मुंबई पुणे मुंबई-३.

सगळे कलाकार म्हणजे मराठी नाट्य आणि चित्रसृष्टी कोळून प्यायलेले. त्यामुळे हे सगळं आपल्याच घरात घडतंय असा होतो भास. प्रशांत दामलेचा बोका आणि संयमी वडील उत्कृष्ट. विजय केंकरे मुलीचे वडील परफेक्ट, स्वयंपाक न येणाऱ्या मुलीच्या आईची तगमग, शिस्त, सविता प्रभुणे खरंच मस्त. डॉ. शुभा म्हणजे रोहिणी हट्टंगडी सहज अभिनय. मुंबईची गौरी- मुक्ता बर्वे आणि पुण्याचा गौतम- स्वप्नील जोशी. अफलातून जोडी. कुठेही रबर ताणले नाही, सगळा चित्रपटाचा तोल सांभाळला आहे.  गाणीपण प्रसंगानुरूप आणि साजेशी. तरुणपणी प्रेमात पडून, लग्न करून आता पुढच्या संसारात रमलेली जोडी त्यांच्या प्रेमातली गोडी, आई आणि बाप होताना वाढलेली जाडी, अगदी परफेक्ट. सध्याच्या नवीन लग्न करणाऱ्या जोडप्यांच्या अनेक गोष्टी, अनेक प्रसंगातून मस्त मांडल्या आहेत. पोटातलं बाळ प्रेक्षकांशी मारतय गप्पा.

मुंबई पुणे मुंबई १, २, ३.,मस्त,  आता ४ पण प्रेक्षकांना पहायची इच्छा होईल कारण ३ मध्ये संपलं नाही.तर सुरू झालंय चांगल्या बाबाचं चांगलं काम.

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना...

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा...

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा ई. ना स्थान नसते. प्रेमापुढे...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व...

About The Author