‘कोण म्हणतो लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात?’

‘कोण म्हणतो लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात?’ टी व्ही सिरियलचं शूटिंग करता करता बांधल्यात ह्यांनी लग्नाच्या गाठी.

…अहो नाही… असंच जमलं, आम्हाला कळलं पण नाही, कधी जमलं ते.

म्हणजे ? तुमचं लग्न इथंच जमलं? टी व्ही वर काम करता करताच?

…. सांगतोय काय? अहो आमची ही पहिलीच सिरीयल, आणि त्याचं शूटिंग चालू असतानाच कधी जमलं ते आम्हालाच नाही कळलं.   

आजकाल हे असलं काहीतरी ऐकायला मिळतंय बघा. आत्ता इथं समोर होते, असं म्हणेपर्यंत ह्या ही प्रेमी युगुलं लग्न करून जोडीनं पायाच पडायला येतात बघा. कळतच नाही हिचं लग्न झालं कधी?. तो कधी बोहल्यावर चढला

अख्या टी व्ही भर सगळ्या चॅनलला कुठंही बघा सगळीकडं सिरियलच चालू असतात. एक एक जण दोन दोन सिरीयल मध्ये काम करतात. ह्या सिरियालमध्ये ह्याचं हिच्याबरोबर काम तर दुसऱ्या सिरियलमध्ये हिचं त्याच्याबरोबर काम. आता गडबड अशी होते की खऱ्या आयुष्यात कोणाचं लग्न कोणाबरोबर नक्की झालय का अजून नाही झालं हे शोधून काढावं,  तेंव्हा कळतं.

अहो आपण एवढे लोक त्यांच्या ह्या सिरीयल रोज न चुकता बघतो पण  साधं लग्नाचं आमंत्रण पण देत नाहीत हो….

आता बघा ही लिस्टच काढली आज आम्ही ह्या टी व्ही वर काम करणाऱ्या काही कलाकारांची.  ह्यांची लग्नं झालीत. पण कधी ? ह्याचा कोणालाच पत्ता नव्हता. हां sssएखादा असतो चांगला, अगदी सगळ्या महाराष्ट्राला कळतंय की ह्यांच्या लग्नाचा बार आज उडाला अनिकेत विश्वासराव सारखा.. पण बाकीचे कसे छुपे रुस्तम.

बघाच मग ही लिस्ट आता.

 
 

READ ALSO :  रोहित शेट्टीचे मराठी ढंगाचे सिनेमे बंद होणार.!! कारण सिंघमची जागा घेतली दुसऱ्या हिरो ने..

*नंबर एक जोडी- “सुयश टिळक” आणि” अक्षया देवधर”. “का रे दुरावा” ह्या सिरियलचा नायक आणि “तुझ्यात जीव गुंतला” ची नायिका म्हणजे अंजलीबाई, सगळ्यांना माहिती आहे. पण ह्यांचं जमलं कधी हे कुणालाच माहिती नव्हतं. बरोबर फिरताना दिसले तेंव्हा कळलं.

* सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर हे दोघे तर २०१७ पासून रिलेशनशिपमध्ये आहेत पण कोणाला पत्ताच नव्हता. आता सारखेच एकत्र दिसतात. सिद्धार्थ म्हणजे ‘ गुलाबजाम ‘ मधला बरका.

*अस्मिता मालिकेची नायिका म्हणजे “मयुरी वाघ” ’शोधलं की सापडतं’ असं सारखं म्हणायची.  गुन्हेगार शोधता शोधता जोडीदार सुद्धा शोधला तिने त्याच सिरीयल मध्ये भूमिका करणारा “पियुष रानडे” मयुरीची ही पहिलीच मालिका आणि कधी कसं जमलं ते त्या दोघांनाच ठाऊक.

*’दिल दोस्ती दुनियादारी’ पहिलीच सिरीयल आणि दोघेही त्याच सिरियलमध्ये काम करत होतेहो…. आणि जमलं की . ” सुव्रत जोशी” आणि “सखी गोखले.” पटकन जमवून मोकळे झाले. 

* “उमेश कामत “आणि “प्रिया बापट” २०११साली लग्न केलं ह्या दोघांनी पण त्याच्या आधी सहा वर्षे एकमेकांना भेटत होते पण कोणाला काहीही न कळता गुपचूप. आता प्रिया काय गोड बातमी देणार आहे ह्याची त्यांचे चाहते वाट पाहतायत. 

* इशा केसकर म्हणजे’ येळकोट येळकोट जय मल्हार मधली ‘ बानू ‘ आणि झी मराठीच्याच ’माझ्या नवऱ्याची बायको’ मधली दुसरी ‘शानाया’ आणि हा “ऋषी सक्सेना” म्हणजे” काहे दिया परदेस” ह्या सिरियलचा मुख्य नायक “शिव” ह्या जोडीने तर सगळ्यांना धक्काच दिला. कोणालाही कल्पना आली नसेल की हे दोघे एकत्र येतील , पण आले आणि आता सगळ्यांसमोर बोलायलाही लागले. आणि त्यांच्या नात्याचा त्यांनी गौप्यस्फोट सुद्धा केला.

*”उर्मिला कानिटकर “आणि “आदिनाथ कोठारे” एक मस्त जोडी. असंच सीरियलच्या शूटिंगमध्ये एकमेकांच्या प्रेमात पडले. आणि एकमेकांचे झाले. २७ डिसेंबर २०११ ला विवाह बंधनात अडकले. आता त्यांना एक गोड कन्यारत्न आहे, तिचं नाव आहे “जिजा”.

* “श्रुती मराठे” आणि “गौरव घाटणेकर ” ह्या दोघांनीही एका चित्रपटात काम केलं, आणि लगेचच एकमेकांच्या प्रेमात पडले. श्रुती सध्या ‘जागो मोहन प्यारे’ ह्या सिरियलमध्ये दिसते आहे. आणि गौरव दिसतो ‘शतदा प्रेम करावे’ सिरियलमध्ये.

**कशी वाटली “अशी ही जुळवा जुळवी”**

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author