का यावे लागले शरद केळकरला ग्वाल्हेर सोडून मुंबईला?

का यावे लागले शरद केळकरला ग्वाल्हेर सोडून मुंबईला?

शरद केळकर हा हिंदी टीव्ही मालिका आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रतिभावान कलाकार आहे. हिंदीसोबतच शरदने मराठी चित्रपटातही अभिनय केला आहे. शरदचा चित्रपटसृष्टीतील प्रवास थोडा वेगळा आहे. अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेला शरद अगदी अचानकपणे चित्रपटसृष्टीकडे आकर्षित झाला. शरद मुळचा ग्वाल्हेरचा. शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो एका खाजगी जिम मध्ये जिम ट्रेनर म्हणून काम करत होता. सहज म्हणून स्वप्नांच्या शहरात म्हणजेच मुंबईत आला आणि त्याचे नशीब उजळले. २००२ हे साल त्याच्यासाठी खूपच लकी ठरले असे म्हणावे लागेल कारण मुंबईत आल्यावर तो  ग्रासिम मिस्टर इंडिया या किताबासाठी फायनलीस्ट ठरला. त्यानंतर त्याने टिव्ही मालिका क्षेत्रात पदार्पण केले.

सारेगमप या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाचे कामसुद्धा त्याने केले. शरदने  ‘चिनू’ या मराठी चित्रपटातुन चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. शरदला जास्त लोकप्रियता मिळाली ती झी टिव्ही वरील ‘सलोनी के सात फेरे’ या हिंदी मालिकेमुळे. या मालिकेमधील त्याच्या अभिनयामुळे शरद रसिक प्रेक्षकांच्या घराघरात जाऊन पोहचला व अतिशय लोकप्रिय झाला. टिव्हीमालिकेत अभिनय करता करता शरदला त्याची सहचारिणी अभिनेत्री कीर्ती गायकवाडच्या रूपाने मिळाली. सर्व प्रेक्षकांचा लाडका शरद ३ जून २००५ साली कीर्ती गायकवाड बरोबर लाग्नाबंधनात अडकला.

 

READ ALSO : मुंबई पुणे मुंबई ३ मधील या खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

शरदने एमबीए इन मार्केटिंग मध्ये शिक्षण पूर्ण केले आहे. तरुण वयात शरदने वडिलांचे छत्र गमावले.  त्यांच्या पश्चात शरदची आई आणि बहिण ह्या दोघींचे त्याला पाठबळ मिळाले. शरदने आजवर बऱ्याच हिंदी आणि मराठी चित्रपटात अभिनय केला आहे. राक्षस या मराठी चित्रपटात त्याने प्रथमच सई ताम्हणकरबरोबर प्रमुख भूमिकेत अभिनय केला. त्या चित्रपटातील त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला.  

नेहमीच वेगवेगळ्या भूमिका साकारणारा शरद आता त्याच्या आगामी मराठी चित्रपटात एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्या चित्रपटाबाबत एक खास बात अशी कि तो प्रथमच सोनाली कुलकर्णी सोबत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘माधुरी ‘ आहे. त्याच्या भूमिकेबद्दल जास्त काही सांगणार नाही कारण प्रेक्षकांची उत्सुकता महत्वाची आहे.. शरदला आपण परत एकदा भेटणार आहोत येत्या ३० नोव्हेंबरला.

शरद तुला तुझ्या आगामी चित्रपटासाठी फिल्मिभोंगा मराठी कडून खूप शुभेच्छा.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author