श्रद्धा का चिडली …?

श्रद्धा का चिडली …?

सध्या श्रद्धा कपूर एका  वेगळ्या गोष्टीमुळे चर्चेत आहे, तर चर्चा अशी कि श्रद्धा सध्या बॅडमिंटन कोर्टमध्ये घाम गाळतेय. पण आता तिचाही संयम सुटलाय आणि आता तिनेही सायना नेहवालला खरी-खोटी सुनावली. आता आम्ही कशाबद्दल बोलतोय, हे एव्हाना तुमच्या ध्यानात आलेचं असेल. होय, आम्ही बोलतोय ते भारताची फुलराणी अर्थात बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिच्यावर आधारित बायोपिकबद्दल. या चित्रपटात श्रद्धा कपूर दिसणार आहे. पण या बायोपिकमध्ये श्रद्धाने सायनासारखे अगदी प्रोफेशनल प्लेअर दिसावे, असा सायनाचा अट्टाहास आहे. माझी व्यक्तिरेखा पडद्यावर साकारण्यासाठी श्रद्धाला आणखी मेहनत करावी लागेल, असे सायना अलीकडे एका मुलाखतीत म्हणाली. सायनाची ही मुलाखत ऐकली अन् श्रद्धा जरा चिडली आणि तिच्या संयमाचा बांध सुटला, पुढे तीने सायनाला खडे बोल सुनावले ती म्हणाली “सायनाच्या बायोपिकसाठी मी जीवतोड मेहनत घेतेय. कोर्टवर प्रोफेशनल प्लेअर दिसावी, म्हणून माझेही प्रयत्न सुरू आहेत. पण काही महिन्यांच्या प्रशिक्षणात मी एकदम प्रोफेशनल प्लेअर बनून जाईल, हे शक्य नाही. एक वर्षांत मी खूप घाम गाळला आहे, “ काही सूत्रांनुसार श्रद्धाने निर्माता- दिग्दर्शकालाही माझ्या कामाबद्दल समाधानी नसाल तर दुसरी सोय बघा, हे सांगून टाकले आहे. श्रद्धाचा हा पावित्रा बघून निर्माता- दिग्दर्शकचं नाही तर सायनाही नरमली आहे आणि येत्या सप्टेंबरपासून या चित्रपटाचे शूटींग सुरु करण्यास राजी झाले आहेत.

 

READ ALSO : मराठमोळी अमृता आणि “सत्यमेव जयते “ या चित्रपटातील सरिता दोघींचा स्वभाव सारखा

2017 हे वर्ष श्रद्धा कपूरसाठी फारसं लकी राहिलं नाही़ या वर्षांत आलेले ‘ओके जानू’ आणि ‘हसीना पारकर’ हे तिचे दोनही चित्रपट बॉक्स आॅफिसवर फ्लॉप झाले. लवकरच श्रद्धाचा ‘स्त्रि’ आणि ‘बत्ती गुल मीटर चालूू’ रिलीज होत आहेत. प्रभासच्या अपोझिट ‘साहो’मध्येही ती झळकणार आहे.

सध्या श्रद्धाच्या “स्त्री” ची बरीच चर्चा रंगत आहे. श्रद्धा बरोबर स्त्री या चित्रपटात राजकुमार राव आहे. स्त्री च्या ट्रेलर मध्ये असे नमूद केले आहे, “मर्द को दर्द होगा  यावरून हा चित्रपट नक्कीच काहीतरी खास घेऊन येणार अशी खात्री आहे. तसेच श्रद्धा तिच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरु करणार असून ती आपल्याला एका अनोख्या भूमिकेत बघायला मिळणार.

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळबऱ्याच दिवसांपासून नचिकेत प्रधान ‘गर्लफ्रेंड’च्या शोधात असल्याचं तुमच्या कानी आलं असेल. गर्लफ्रेंड कशी असावी? या बद्दलच्या त्याच्या अपेक्षाबद्दल देखील तुम्ही बरंच काही ऐकून असाल. नचिकेतच्या प्रयत्नाला अखेर यश आले असून...

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

छत्रपतींचे महापराक्रमी योद्धा ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा पोस्टर लाँच दिमाखात संपन्नशिवराज्याभिषेक दिना निमित्त हेलिकॉप्टरमधून गड किल्यांचे दर्शन घेत वाहिली शिव छत्रपतींना मानवंदना.हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य...

About The Author