मराठी संगीत विश्वातील संगीताचा देव हरपला: ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’,

मराठी संगीत विश्वातील संगीताचा देव हरपला: ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’,

मराठी चित्रपटसृष्टीत अनेक अजरामर गीतांना संगीतबद्ध केलं. ती गाणी अजुनही आपल्या ओठावर तरळत असतात.

आज आपल्यात संगीतातील देव नाही याची खंत संपूर्ण चित्रपटसृष्टीला व अभिजात संगीताच्या चाहत्यांमध्ये आहे. संगीत साधनेचा वारसा त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाला. त्यांनी संगीत क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. मराठी चित्रपटगीतांसोबतच नाट्यपद, अभंग, गजल, भावगीत, समूहगीत, लोकगीत, युगुलगीत यांच्यासह संगीताच्या अनेक क्षेत्रांमध्ये यशवंत देव यांनी आपला वेगळा ठसा उमटविला. ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, ‘नको जाऊ कोमेजून माझ्या प्रीतिच्या फुला..’, ‘जीवनात ही घडी अशीच राहू दे’, ‘भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी’, ‘कुठे शोधिसी रामेश्वर’, ‘येशिल येशिल येशिल राणी’, अशा अनेक संगीतबद्ध केलेल्या गाण्यांच्या सादरीकरणाने रसिकांना सुरेल मराठी गीतांची अनुभूती यशवंत देव यांनी दिली

 

READ ALSO : आणि डॉ. काशिनाथ घाणेकर: आता काशिनाथ पर्व सुरु ….

यशवंत देव हे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावंत गीतकार-संगीतकार म्हणून ओळखले जातात. त्यांचे संगीताकडे वळण्याचे खरे श्रेय जाते ते जी. एन. जोशी आणि गजाननराव वाटवे यांच्या शब्दप्रधान गायकीला. त्यांच्या संगीत क्षेत्रातील कारकिर्दीला खरी सुरुवात झाली ती सतारवादक म्हणून एच. एम. व्ही. तील नोकरीपासून. त्यानंतर त्यांनी खऱ्या अर्थाने संगीत क्षेत्रात स्वत:ला वाहून घेतले. ज्येष्ठ संगीतकार अनिल विश्वास यांना त्यांनी गुरुस्थानी मानले. सुरुवातीच्या काळात यशवंत देव यांनी नोकरी सांभाळत ‘शहजादा’ चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी पार पाडली होती.

आकाशवाणीवरील ‘भावसरगम’, ‘असे गीत जन्मा येते’, ‘शब्दप्रधान गायकी’, ‘रियाजाचा कानमंत्र’ आणि स्वत:च्या रचनांचे रंगमंचीय कार्यक्रम यशवंत देव यांनी दीर्घकाळ सादर केले. त्याचबरोबर, संगीतविषयक कार्यशाळा त्यांनी मोठ्या प्रमाणात घेतल्या. लता मंगेशकर, वसंत प्रभू, पी. सावळाराम, आशा भोसले, उषा मंगेशकर यांनी गायलेल्या गीतांना सुरेल संगीताची साथ दिली. ‘झालं-गेलं विसरून जा’ या चित्रपटाची त्यांची गाणी विलक्षण गाजली.

यशवंत देव यांना गदिमा पुरस्कार, गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा राम कदम कलागौरव पुरस्कार असे विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते.

दीर्घ आजारामुळे यशवंत देव यांनी दादरच्या सुश्रुषा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते 92 वर्षांचे होते. सोमवारी रात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या काही दिवसांपासून विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या देव यांच्यावर दादर येथील शुश्रूषा रुग्णालयात उपचार सुरू होते.

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळबऱ्याच दिवसांपासून नचिकेत प्रधान ‘गर्लफ्रेंड’च्या शोधात असल्याचं तुमच्या कानी आलं असेल. गर्लफ्रेंड कशी असावी? या बद्दलच्या त्याच्या अपेक्षाबद्दल देखील तुम्ही बरंच काही ऐकून असाल. नचिकेतच्या प्रयत्नाला अखेर यश आले असून...

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

छत्रपतींचे महापराक्रमी योद्धा ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा पोस्टर लाँच दिमाखात संपन्नशिवराज्याभिषेक दिना निमित्त हेलिकॉप्टरमधून गड किल्यांचे दर्शन घेत वाहिली शिव छत्रपतींना मानवंदना.हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य...

ललित प्रभाकरचा ‘मीडियम स्पाइसी’ व्हिडीओ

ललित प्रभाकरचा ‘मीडियम स्पाइसी’ व्हिडीओ

‘मीडियम स्पाइसी’ या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली असून या चित्रपटात एक प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेता ललित प्रभाकर बरोबर चित्रपटाच्या टीमने एक युनिक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यातून सेटवर असणाऱ्या कलाकारांकडून चित्रपटाच्या मूड विषयी काहीशी...

About The Author