होय, धनंजय माने इथेच राहतात

धनंजय माने सध्या कुठे राहतात ? असा प्रश्न कधी आलाय का तुमच्या डोक्यात ? प्रश्न थोडा विचित्र आहे पण काही क्षण विचार करून पहा. चित्रपटात धनंजय माने आणि त्यांचे मित्र पाषाण रोड वरच्या लीलाबाई काळभोर यांच्या बंगल्यात भाड्याने राहत होते. ते जर खऱ्या जगात असते तर आज ३० वर्षानंतर ते नक्कीच कुठेतरी दुसरीकडे शिफ्ट झाले असते. मला असं वाटतं ते खरंच शिफ्ट झालेत.. आताच्या जगात धनंजय माने आणि कंपनी आपल्याला आसपास नेहमी जाणवत असतात. भुताटकीच्या रुपात नाही हा.. लाक्षणिक अर्थाने.. उदाहरण द्यायचं झालं तर

एके दिवशी माझ्या एका मित्राने, श्रीधर इंगवले ने माझा दुसरा मित्र राहुल पाध्येचा डबा त्याला न विचारता खाल्ला. त्यावर चिडून राहुल, श्रीधरला म्हणाला “हा हलकटपणा आहे माने” श्रीधर इंगवलेला योग्य तो संदेश पोहोचला… त्यावर श्रीधर, राहुलला म्हणाला, “तुम्ही आमचे डबे खाता ते… कॉन्ट्रीचे २०० रुपये अजून दिले नाहीत ते” हे बोलून दोघे हसायला लागले…

ऑफिसमध्ये टाईमपास करणारे दोन कर्मचारी

कर्मचारी १ : हा सनी लियोनीचा नवा dance बघ ना..

कर्मचारी २: मोबाईल खाली कर,(बॉसला उद्देशून) तो टूकलू बघेल ना येड्या…

फेसबुकवर

पोस्ट – अमुक तमुक नेत्याने रोड दुरुस्त करण्याचं आश्वासन दिलेलं आहे .

भाष्य करणारा – करतोय तो.. वाट बघा..

मोबाईलवर बोलताना 

मित्र  : कोण कोण आहात तिथे ?

कामगार : मी आणि ज्याला बायकोने टाकलंय तो

मित्र  : बायको कोण ?

कामगार : सुपडी

मित्र  : आणि तो कोण?

कामगार : कचरा

कॅन्टीनमध्ये:

प्रियकर : चल, प्लाझाला जाऊ फिल्म बघायला

प्रियसी : सारखं सारखं त्याच थेटरात काय !

इतकंच काय तर इज्राइलचं नाव ऐकताच डोळ्यापुढे येतं ते म्हणजे diabeties ची औषध आणि ते वारलेले ७० रुपये… अभ्यासाचा देखावा करणाऱ्याला ‘शंतनू’ म्हणून चिडवलं जातं. लुक्ख्या मजनूना “तिचा बाप तुला बाजारमास्तर म्हणून हि ठेवणार नाही”. म्हणत खिल्ली उडवली जाते.. “तुमचा जोडा खूप चांगला आहे, तोंडात मारण्यासारखा..” अशा comments नवविवाहितांच्या पोस्टवर सर्रास आपण वाचतो. मित्रांच्या ढेरीने एकदा तरी “कुणी तरी येणार येणार गं” चा तडाखा खाल्लेला असतो…

तात्पर्य काय… एक चित्रपट त्यातील व्यक्तिरेखा लोकांना इतक्या आवडतात  कि इतक्या वर्षांनी हि लोक त्या चित्रपटाचे संवाद रोजच्या आयुष्यात सहज म्हणून वापरतात. त्या संवादांनी योग्य तो संदेश हि पोहोचतो आणि बोलण्यात एक व्हरायटी हि येते….“अशी हि बनवाबनवी” या चित्रपटाने मराठी रसिक मनात जे विनोदाचे बियाणे पेरले आहे त्याची फळ आपल्याला आज हि चाखायला मिळतात. म्हनुंच मला असं वाटतं कि धनंजय माने आणि कंपनी त्या पाषाण रोड च्या बंगल्यातून शिफ्ट होऊन चाहत्यांच्या विनोदबुद्धीमध्ये कायमचे राहायला आलेले आहेत.

मित्रांनो तुम्हाला जर हा लेखनप्रपंच आवडला असेल तर माझा ब्लॉग नक्की शेयर करा. याविषयी तुमच्या मनात आलेल्या कल्पना, तर्क कमेंटमध्ये जरूर लिहा. खुश रहा..फिल्मी रहा.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author

Filmi Shinde

कथा, पटकथा, संवाद या तिन्ही विभागात प्राविण्य मिळवलेले सुशांत शिंदे सध्या चित्रपटलेखन, मालिकालेखन आणि डिजीटल क्षेत्रासाठी काम करत आहेत. सुशांत शिंदे याचं लेखन प्रेक्षकांना हास्य, रहस्य आणि नाट्य याच्या अद्भुत मिश्रणाने खिळवून ठेवतं. फिल्मी भोंगा या वेब पोर्टल साठी ते 'फिल्मी शिंदे' या नावाने ब्लॉग लिहितात.