‘यु अँड मी’ मैत्रीवरील मैत्रिणीने लिहिले पहिले गाणे….

‘यु अँड मी’ मैत्रीवरील मैत्रिणीने लिहिले पहिले गाणे….

जरा सा कट्टा टाकू आता… जरासी बाते तेढीमेढी…

थोडासा किस्सा करू आता… थोडीशी यादे तेरी मेरी…

करू आम्ही मनमानिया… ऐसी है अपनी यारीया…

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत इशा केसकरच्या अगोदर खलनायिकेची भूमिका साकारलेली शनाया म्हणजे सर्व प्रेक्षकांची आवडती रसिका सुनील. या मालिकेत शनाया आणि इशा या दोघींची मैत्री खूप प्रसिद्ध आहे. त्यांचा दोस्ताना काही निराळा आहे. आपला दोस्ताना कायम ठेवत पुन्हा एकदा बदमाशियां करण्यासाठी या दोघी सज्ज झाल्या आहेत. फक्त आता त्यांचा हा दोस्ताना हा नुकताच येऊ घातलेल्या ‘यू अँड मी’ या नव्या व्हिडीओ अल्बमसाठी आहे. ‘यु अँड मी’ हे रसिका सुनील हिने स्वरबद्ध केलेले गाणे नुकतेच युट्यूबवरून  प्रदर्शित झाले आहे. हा त्यांचा व्हिडीओ अल्बम जरा हटके अंदाजात आहे.

READ ALSO : सदाबहार गाण्यांची मैफल भाग ४ 

ह्या व्हिडीओ अल्बममधील गाणे स्वतः अदिती द्रविडने लिहिले आहे. रसिका सुनीलने हिने हे गायले आहे. साई–पियुष यांनी या गाण्याला संगीतबद्ध केलं आहे. फुलवा खामकर हिने या गाण्याचं नृत्यदिग्दर्शन केलं आहे. छायांकन अमोल गोळे यांचे आहे. ह्या गाण्याचे शूटिंग हे लोणावळा येथे झाले आहे.

मराठीत असे हे पहिलेच गाणे असावे कारण मित्रांवरील गाणी अनेक आहेत पण मैत्रिणीवर अजूनपर्यंत कोणतेही गाणं आलेलं नाही. अदितीनेसुद्धा रसिकाबरोबर हे गाणे गायले आहे. गाणे पाहिल्यावर कळते या दोघींनी खूप धमाल केली असणार.  हे गाणे पाहिल्यावर हिंदी चित्रपटातील राणी मुखर्जी आणि प्रीती झिंटा यांच्या हर दिल जो प्यार करेगा या हिंदी चित्रपटातील ‘पिया पिया ओ पिया ‘ या गाण्याची आठवण करून देते. जरी हे गाणे आणि रसिका व अदितीचे गाणे भिन्न असले तरीही त्यातही अशाच दोन मैत्रिणी होत्या.

धमाल मस्ती मज्जा असलेला ह्या  व्हिडीओ अल्बमची निर्मिती  व्हिडिओ पॅलेसने केली आहे. ह्या गाण्याची एक खासियत म्हणजे ह्या गाण्यात रसिका आणि अदिती यांनी १२ निरनिराळे ड्रेसेस परिधान केले आहेत. अभिनयाचा रंग तर प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. अशी आशा आहे कि त्यांच्या गाण्याचे सूरही प्रेक्षकांच्या पसंतीस नक्कीच पडतील. रसिका आणि आदितीला त्यांच्या ह्या व्हिडीओ अल्बमसाठी खूप खूप शुभेच्छा.

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळबऱ्याच दिवसांपासून नचिकेत प्रधान ‘गर्लफ्रेंड’च्या शोधात असल्याचं तुमच्या कानी आलं असेल. गर्लफ्रेंड कशी असावी? या बद्दलच्या त्याच्या अपेक्षाबद्दल देखील तुम्ही बरंच काही ऐकून असाल. नचिकेतच्या प्रयत्नाला अखेर यश आले असून...

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

छत्रपतींचे महापराक्रमी योद्धा ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा पोस्टर लाँच दिमाखात संपन्नशिवराज्याभिषेक दिना निमित्त हेलिकॉप्टरमधून गड किल्यांचे दर्शन घेत वाहिली शिव छत्रपतींना मानवंदना.हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य...

About The Author