यंग्राड’ तरुणांच्या भावविश्वाचं संपूर्ण ‘रिंगण’ लवकरच येतंय पडद्यावर

     ‘यंग्राड’ तरुणांच्या भावविश्वाचं संपूर्ण ‘रिंगण’ लवकरच येतंय पडद्यावर  

“सोळावं वरीस धोक्याचं” असं जगदीश खेबुडकरांनी जे म्हटलंय ते फक्त मुलींनाच लागू होतं असं नाही, तर ते मुलांनाही लागू होतं.. आणि त्यातल्या त्यात उनाड मुलांना तर जास्तच लागू होतं. कारण खरंच तरुणपणाच्या रस्त्यावरच हे पहिलं ठिकाण असतं नाक्याचं, जिथे आपल्याला आयुष्याची दिशा ठरवायची असते.. आणि ती ठरवत असताना “मला सर्व काही कळतं” असा अविर्भाव मनात आला कि पाऊल वाकडं पडलंच म्हणून समजा. अशाच ४ यंग्राड म्हणजेच उनाड मित्रांची कथा घेऊन आलेले आहेत दिग्दर्शक मकरंद माने त्यांच्या आगामी चित्रपटात, ज्याचं नावचं आहे ‘यंग्राड’.

         ४ जिवलग मित्र – त्यांची व्यसनं, पहिलं प्रेम – पैशाची चणचण, खुणावणारा वाईट मार्ग – आणि अविचाराने घेतलेला निर्णय, या चक्रव्युहात अडकलेल्या ४ नवतरुणांच्या संघर्षाची, त्यांच्या प्रत्येक कृतीत दडलेल्या भावनांची गोष्ट दिग्दर्शक मकरंद माने यांनी अचूक टिपलेली आहे. “करायचं ते चांगलंच करायचं” असा ध्यास घेतलेल्या या अभ्यासू दिग्दर्शकाच्या पहिल्याच चित्रपटाला म्हणजेच “रिंगणला” २०१५ साली राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्या चित्रपटात त्यांनी बाप आणि मुलगा यांच्या नात्याचा आणि त्यांच्या सुखाच्या शोधाचा मागोवा घेतला होता. २०१८ मध्ये मकरंद माने यांनी ‘यंग्राड’ या चित्रपटामधून कुमारवयीन मुलांची मनोवस्था, त्यांचं  कौटुंबिक विश्व आणि सामाजिक मुल्ये यांची गुंफण दाखविलेली आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला.

विठ्ठल पाटील प्रॉडक्शन्सचे- विठ्ठल पाटील , फ्युचरवर्क्स मिडिया लिमिटेडचे – गौतम गुप्ता व गौरव गुप्ता आणि फँटम फिल्म्सचे – अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवाणी, विकास बहल आणि मधु मंटेना यांनी संयुक्तरित्या या चित्रपटाची निर्मिती केली असून ‘यंग्राड’चे दिग्दर्शन केलंय मकरंद माने यांनी. चित्रपटाची कथा लेखन मकरंद माने यांची असून या चित्रपटाची पटकथा स्वतः मकरंद माने, शशांक शेंडे आणि अझीझ मदारी यांनी लिहिलेली आहे. युवा संगीत दिग्दर्शक हृदय गट्टानी आणि गंगाधर यांनी या चित्रपटाला संगीत दिलेले आहे. चित्रपटातील गाणी क्षितीज पटवर्धन, दत्ता पाटील आणि माघलुब पूनावाला यांनी लिहिली आहेत. यातील चार गाणी शंकर महादेवन, दिव्य कुमार, शाश तिरुपती आणि हृदय गट्टानी यांनी आपल्या मधुर स्वरांनी सजवलेली आहेत. चित्रपटात ४ यंग्राड मित्रांच्या भूमिका साकारलेल्या आहेत चैतन्य देवरे, सौरभ पडवी, शिव वाघ आणि जीवन कराळकर या तरुणांनी. त्याशिवाय चित्रपटात शरद केळकर, सविता प्रभुणे, शिरीन पाटील, मोनिका चौधरी, शशांक शेंडे, विठ्ठल पाटील आणि शंतनू गणगणे यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत.

          मनोरंजन विश्वामधील अशाच ताज्या घडामोडींसाठी आणि गमती जमतीं जाणून घेण्यासाठी फिल्मीभोंगाला भेट देत रहा. खुश रहा.. फिल्मी रहा.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author

Filmi Shinde

कथा, पटकथा, संवाद या तिन्ही विभागात प्राविण्य मिळवलेले सुशांत शिंदे सध्या चित्रपटलेखन, मालिकालेखन आणि डिजीटल क्षेत्रासाठी काम करत आहेत. सुशांत शिंदे याचं लेखन प्रेक्षकांना हास्य, रहस्य आणि नाट्य याच्या अद्भुत मिश्रणाने खिळवून ठेवतं. फिल्मी भोंगा या वेब पोर्टल साठी ते 'फिल्मी शिंदे' या नावाने ब्लॉग लिहितात.