‘झिपऱ्या’ च्या स्पेशल शो मध्ये निर्मात्यांनी जपली सामाजिक बांधिलकी

बूट पॉलिश करून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शरद पवार यांच्या हस्ते आर्थिक मदत

पुणे, दि. १८ जून – बूट पॉलिश करून शिक्षण घेणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी “झिपऱ्या”ची निर्मिती संस्था ए.आर.डी. प्रॉडक्शन्सच्या वतीने माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते प्रत्येकी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. निमित्त होते ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक अरुण साधू यांच्या कादंबरीवर आधारीत ‘झिपऱ्या’ या आगामी मराठी चित्रपटाच्या स्पेशल शो चे.

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, ज्येष्ठ पत्रकार, खासदार कुमार केतकर, साधू यांच्या पत्नी अरुणा साधू, निर्मात्या अश्विनी रणजीत दरेकर, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणेच्या संज्ञापन व वृतपत्र विभागाच्या प्रमुख डॉ. उज्वला बर्वे, दिग्दर्शक केदार वैद्य, अभिनेता सक्षम कुलकर्णी, चिन्मय कांबळी, प्रवीण तरडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बूट पॉलिश करून शिक्षण घेणाऱ्या विशाल किसन उतेकर आणि विकास किसन उतेकर या विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा धनादेश पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

साधू यांच्या साहित्याचा गौरव करताना शरद पवार म्हणाले, अमरावती जिल्ह्यातील अचलपुरहून मुंबईत येऊन खऱ्या अर्थाने ते मुंबईकर झाले. मुंबई कुणालाही उपाशी ठेवत नाही. ती कायमच उत्साह देते. साधू यांनी मुंबई मध्ये जे अनुभवलं त्याचे उत्तम शब्दांकन करत दर्जेदार साहित्य निर्मिती केली आणि मराठी साहित्य समृद्ध केले. त्यांच्या सिंहासन चित्रपटावेळी  आम्ही मुख्यमंत्र्यांची केबिन, बंगला चित्रीकरणासाठी उपलब्ध करून दिला होता. या चित्रपटाच्या माध्यमातून राजकारण्यांची काहीशी टिंगल करण्यात आली होती, मात्र त्या टिंगलीतून काही चांगलं दिले जाणार असेल तर त्याचाही आम्ही आनंद घेतो असेही पवार यांनी नमूद केले.

तसेच साधू यांना ज्याबद्दल आस्था होती, त्यासाठी ग्रंथाली आणि साधू परिवार पाठ्यवृत्तीच्या माध्यमातून कृतिशील पावले उचलत आहे याचा आनंद वाटतो. ‘झिपऱ्या’ सिनेमाच्या निमित्ताने साधु यांचे साहित्य आणि त्यांचे स्मरण पुढील पिढ्या करतील असेही पवार म्हणाले.

दरम्यान या प्रसंगी अरुण साधू स्मृती जतन समिती आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणेच्या संज्ञापन व वृतपत्र विभागाच्या वतीने साधू यांच्या स्मृतीदिनामिमित्त जाहीर करण्यात आलेल्या फेलोशिपची माहिती खासदार कुमार केतकर यांनी दिली. तर सामाजिक बांधिलकी जपण्याची शिकवण आणि वाचनाचे संस्कार बालपणातच झाले त्यामुळेच आज ‘झिपऱ्या’ सारख्या साहित्यकृतीवर चित्रपट निर्माण करू शकल्याची भावना निर्मात्या अश्विनी रणजीत दरेकर यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रिया चित्राव यांनी केले.

 शरद पवार यांनी सपत्निक लुटला सिनेमाचा आनंद

राजकारणी लोकांना स्वःतासाठी, कुटुंबीयांसाठी कधीच वेळ मिळत नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे त्याला कसे अपवाद ठरतील? प्रतिभाताई आणि शरद पवार मोजक्या कार्यक्रमांना एकत्रित हजेरी लावतात, तसेच पवार साहेब आणि सिनेमा असे चित्र आजपर्यंत कधी पाहायला मिळाले नाही, मात्र सोमवारी त्यांनी एकत्रित अरुण साधू यांच्या कादंबरीवर आधारीत ‘झिपऱ्या’ या सिनेमाचा आनंद लुटला. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, माजी मंत्री मधुकरराव पिचड, यशवंतराव गडाख, माजी आमदार उल्हास पवार, दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, वात्रटिकाकार रामदास फुटाणे, हणमंतराव गायकवाड,  आय. ए. एस. अधिकारी आनंदराव व्ही. पाटील, अनिल शिदोरे,प्रकाश मगदुम, सतीश जकातदार, डॉ. सतीश देसाई, सचिन इटकर, सुनील महाजन, ऍड. केदार सोमण, उज्वल निरगुडकर यांच्यासह राजकीय, सिनेमा, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author