तब्बल ३८ वर्षानंतर ‘झिपऱ्या’ जिवंत झालाय

तब्बल ३८ वर्षानंतर ‘झिपऱ्या’ जिवंत झालाय

ख्यातनाम साहित्यिक, पत्रकार अरुण साधू यांच्या १९८०च्या सुमारास प्रकाशित झालेल्या ‘झिपऱ्या’ या कादंबरीवर आधारित चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. अश्विनी रणजीत दरेकर आणि इ-सेन्स मोशन पिक्चर्स प्रस्तुत, ए.आर.डी. प्रॉडक्शन्स आणि दिवास् प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार वैद्य यांनी केले आहे.

        मुंबईचा श्वास समजल्या जाणाऱ्या रेल्वेच्या स्थानकांवर बूट पॉलिश करून मोठ्या खुद्दारीने जीवन व्यतीत करणाऱ्या युवकांची कथा ‘झिपऱ्या’ सिनेमात मांडण्यात आलेली आहे. लेखक अरुण साधूंच्या मते “हि कादंबरी येऊन इतका काळ जरी लोटला असला तरी आयुष्य जगण्याचा संघर्ष मात्र अजूनही बदललेला नाही… कष्ट करून जगणारा प्रत्येक माणूस या कथेशी समरस होऊ शकतो.” केदार वैद्य यांच्या आधी ३ ते ४ दिग्दर्शकांनी लेखक अरूण साधू यांच्याकडून कादंबरीचे हक्क विकत घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु अरुण साधू यांना त्या दिग्दर्शकांनी बनवलेल्या पटकथा भावल्या नाहीत, केदार वैद्य यांनी लिहून आणलेल्या पटकथेने लेखकांना हि जाणीव झाली कि कादंबरीचा आत्मा या दिग्दर्शकाला कळलेला आहे म्हणून अरुण साधू यांनी इतक्या वर्षानंतर या कादंबरीचे हक्क दुसऱ्या कोणाला हि न देता केदार वैद्य यांना दिले.

कादंबरीवरून चित्रपट बनवणं हे भारतामध्ये नवीन नसलं तरी अजून ते भारतीय सिनेसृष्टीच्या मुळाशी पूर्णपणे रुळलेलं नाही. हॉलीवूडमध्ये बनणाऱ्या ४ चित्रपटापैकी १ चित्रपट हा कोणत्या न कोणत्या पुस्तक/कादंबरी किंवा प्रेक्षकांनी आजमावलेल्या साहित्यावर आधारित असतो. मराठीत हि कादंबरीवर आधारित काही चित्रपट प्रदर्शित झालेले आहेत. त्यात लेखक अरुण साधू यांच्याच कादंबरीवर आधारित ‘सिंहासन’, डॉक्टर आनंद यादव यांच्या कादंबरीवर आधारित नटरंग, मिलिंद बोकील यांच्या कादंबरीवर आधारित ‘शाळा’ या सिनेमांचा उल्लेख करता येईल

झिपऱ्या चित्रपटात चिन्मय कांबळी, प्रथमेश परब, सक्षम कुलकर्णी, अभिनेत्री अमृता सुभाष, अमन अत्तार, देवांश देशमुख, नचिकेत पूर्णपात्रे, प्रवीण तरडे, विमल म्हात्रे, दीपक करंजीकर असे एकापेक्षा एक सरस कलाकार आपल्याला पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाला संगीत दिलेलं आहे समीर सप्तीसकर आणि  ट्रॉय – अरिफ यांनी.

तसेच अभिषेक खणकर, समीर सामंत यांनी या चित्रपटातील गीते लिहिली आहेत. कला दिग्दर्शक केलंय विनायक काटकर यांनी, तर नृत्य दिग्दर्शक आहेत उमेश जाधव. या चित्रपटाचं छायांकन केलंय राजेश नादोने यांनी, तसेच साहस दृश्यांचं दिग्दर्शन केलंय अब्बास अली मोगल यांनी.

‘झिपऱ्या’ या चित्रपटाला ५५ व्या राज्य पुरस्कारात तीन पुरस्कारांनी गौरविण्यात आले असून यामध्ये सर्वोत्कृष्ट संकलन देवेंद्र मुर्डेश्वर, सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक विनायक काटकर आणि सर्वोत्कृष्ट वेशभूषा प्रकाश निमकर यांचा समावेश आहे. ‘झिपऱ्या’ हा चित्रपट २२ जुन २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

           मनोरंजन विश्वामधील अशाच ताज्या घडामोडींसाठी फिल्मीभोंगाला भेट देत रहा. खुश रहा..फिल्मी रहा.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author

Filmi Shinde

कथा, पटकथा, संवाद या तिन्ही विभागात प्राविण्य मिळवलेले सुशांत शिंदे सध्या चित्रपटलेखन, मालिकालेखन आणि डिजीटल क्षेत्रासाठी काम करत आहेत. सुशांत शिंदे याचं लेखन प्रेक्षकांना हास्य, रहस्य आणि नाट्य याच्या अद्भुत मिश्रणाने खिळवून ठेवतं. फिल्मी भोंगा या वेब पोर्टल साठी ते 'फिल्मी शिंदे' या नावाने ब्लॉग लिहितात.