अमृता हि अभिनयाबरोबरच  एक अतिशय निपुण अशी नृत्यांगना आहे. अमृताने अभिनेता हिमांशू मल्होत्रा सोबत लग्न केले आहे. दोघांनी आपल्या अभिनय क्षेत्रात प्राविण्य मिळवलेला आहे. तब्बल ९ वर्षे एकमेकांसोबत रिलेशनमध्ये राहिल्यानंतर त्या दोघांनी २४ जानेवारी २०१५ साली विवाह केला. कोन्त्यानी नात्यात रुसवे फुगवे नाही असे होत नाही त्याला आपली लाडकी अमृता काही अपवाद नाही. सर्वाना माहित आहे. अमृता आणि हिमांशू यांनी “नच बलिये सिझन ७” हे जिंकले आहे.

अमृता आणि हिमांशु हे दोघेही उत्तम अभिनेते तर आहेच पण ते किती बेस्ट डान्सर्स आहेत हे त्यांनी नच बलिए 9 मध्ये सिद्ध केले.यातील त्यांच्या प्रत्येक परफॉर्मन्सने लोकांची मने जिंकली होती.या शोमध्ये कन्फेशन राऊंडदरम्यान प्रत्येक जोडप्याला एक गोष्ट एकमेकांसमोर स्टेजवर सांगायची होती त्यावेळी हिमांशुने त्यांच्या रिलेशनशीपबद्दल एक खुलासा केला.

Amruta And Himanshu

हिमांशुने सांगितल्यानुसार,नऊ वर्षाच्या रिलेशनशीपदरम्यान अमृता आणि हिमांशु यांच्यात इतर कोणत्याही कपलप्रमाणे भांडणे होत असत.त्यामुळे अमृताने हिमांशुसोबतचे रिलेशनशीप तोडले आणि ती दुसऱ्या मुलाला डेट करु लागली होती. पण काही दिवसांनंतर तिला हिमांशुची आठवण यायला आणि ते रिलेशनशीप सोडून ती पुन्हा हिमांशुकडे आली होती.

या परफेक्ट लव्हस्टोरीमागे काही गोष्टींचा खुलासा खुद्द अमृता-हिमांशुने’नच बलिए 7’च्या सेटवर केला होता.

दोघेही परफेक्ट कपल म्हणून ओळखले जातात. आजही बरेच लोक अमृताच्या निखळ सौंदर्यावर खूप फिदा आहे. अभिनयात अतिशय निपुण असलेली अमृता २००४ मध्ये गोलमाल या चित्रपटात डबल भूमिका साकारल्या होत्या, या चित्रपटाद्वारे तिने चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले. त्याचबरोबर टेलीव्हिजनच्या दुनियेत ” इंडियाज बेस्ट सिनेस्टार कि खोज” द्वारे पदार्पण केले. अमृताने मराठी बरोबरच बऱ्याच हिंदी चित्रपटात देखील काम केलेले आहे. “नटरंग” मधील तिचे गाणे ” मला जाऊ द्या ना घरी ” हे २००९ चे सर्वात हिट मराठी गाणे ठरले. अमृता हि मुळची पुण्याची. कुठलीही अभिनयाची पार्श्वभूमी नसलेल्या अमृताने स्वतःला हिंदी व मराठी चित्रपट क्षेत्रात सिद्ध केले. आणि आज ती सर्व रसिकांच्या मनावर राज्य करते आहे. मराठमोळ्या अमृताने लग्न मात्र एका हिंदी भाषिकाबरोबर केला आहे व त्यांचे अगदी छान सुरु आहे.