गोंडस चेहरा असूनही खलनायकी रूपातच का आवडतोय जितेंद्र जोशी?

कित्येक वर्षे मराठी सिरिअल्स, मराठी दर्जेदार नाटकं आणि चित्रपटातून नावारूपाला आलेले एक नाव म्हणजे जितेंद्र जोशी. जितेंद्र जोशी हे नाव आता घराघरात पोहोचलेले आहे. चेहरा अगदी गोंडस आणि हावभाव लाडिक करणारा जितेंद्र जोशी हल्ली एकदम बॅड मॅन च्या वेशात आणि आवेशात वावरतोय. भावविभोर नाट्यकलाकृती, हलक्या फुलक्या सिरिअल्स तर कधी कुठे  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या जितेंद्र जोशीला कोणी स्वप्नात सुद्धा खलनायक म्हणून पाहू शकत नाही. त्यातून ‘संत तुकाराम’ सारख्या सोज्वळ चित्रपटात काम केलेल्या जितेंद्र जोशीला कोणी आणि कधी खलनायकाचे रूप दिले असावे बुवा..?

दुनियादारी ह्या संजय जाधवच्या बिग बजेट, बॉलिवूड स्टाईलच्या चित्रपटातून खरे तर जितूचे हे खलनायकी रूप नावारूपाला आहे. ‘म्हेवने म्हेवने अन म्हेवण्यांचे पाव्हने…’ असे म्हणत जितेंद्रने चाहत्यांच्या मनावर गारुडच केले. इस्टमन कलरच्या जमान्यातील चित्रपटात असायचे तसा बेलबॉटम घातलेला, लांब कुरळ्या केसांचा, भीतीदायक व्हिलन जितेंद्रनी भारीच रंगवला.

 
 

READ ALSO : अनिकेत विश्वासराव चढणार बोहल्यावर

श्रेयस तळपदे विरुद्ध बाजी चित्रपटात डोक्याचा गुळगुळीत गोटा घेऊन मार्तंड ह्या पात्राचा प्रयोगही जीतून स्वतःवर केला. दुनियदारीचा सम्राट कोलते – पाटील आणि बाजी मधला मार्तंड दोघेही खलनायक लोकांना खूपच आवडले. आपल्या अभिनयाच्या जोरावर असे वेगवेगळे प्रयोग केल्याने जितू चांगलाच चमकला. इतका चमकला की नेटफलिक्स च्या ‘सेक्रेड गेम्स’ ह्या वेब सिरीज मध्ये देखील त्याला ‘काटकर’ ह्या पात्राची दमदार भूमिका मिळाली. सैफ अली खान, राधिका आपटे, नावझुद्दीन सिद्दीकी ह्यांच्यासारख्या तगड्या अभिनेत्यांच्या फौजेपुढे आपला जितेंद्र जोशी पुरून उरला. शरीराची हालचाल, विशिष्ट लकब, उत्कृष्ट अभिनय, पात्राची जाण, विविध प्रयोग स्वतःवर करून घ्यायची हिम्मत आणि इच्छा ह्या सगळ्याच गोष्टी जितेंद्रला एक चांगला अभिनेता आणि त्या उप्पर एक लक्षात राहील असा खलनायक म्हणून सिद्ध करतात. आता तर खलनायक म्हणजे जितू असेच काहीसे समीकरण झाल्याचे दिसून येत आहे. आणि त्याचा प्रत्येक खलनायक आणि त्याचा रंग ढंग अगदी वेगळा आहे बरं का..!

रितेश देशमुखच्या आगामी ‘माऊली’ या मराठी चित्रपटात देखील जितेंद्र जोशीला मुख्य खलनायकाची भूमिका मिळाली आहे. ट्रेलर पाहता त्याच्या खलनायकाच्या पात्राची भीषणता लक्षात येते. एखाद्यावर चांगलीच जरब बसेल अश्या पद्धतीचे खलनायकी रूप घेऊन जितू आपल्या समोर येत आहे. हिरोच्या बरोबरीने उत्तम खलनायक असे समीकरण आपण रितेशच्या पहिल्या सिनेमात म्हणजेच लै भारी मध्ये पहिलेच आहे. त्यात शरद केळकर ह्या अभिनेत्याने खलनायक वठवला होता. पण माऊली मध्ये देखील तोडीस तोड खलनायक म्हणून आपला जितू उभा ठाकला आहे. रितेशच्या माऊली ह्या पात्राला म्हणजेच हिरोला तो खलनायक म्हणून भारी पडणार हे नक्की.

सतत त्याच त्याच भूमिकेत न अडकता वेगवेगळ्या भूमिकांना जितू उत्तम रित्या न्याय देत आहे. आपला साधा चेहरा, किरकोळ कद काठी, बारीक आवाज ह्यांच्यातील कमतरता बाजूला सारून त्याचा योग्य तऱ्हेने उपयोग कसा करता येईल ह्याचे गमक जीतूला चांगलेच गवसले आहे. त्यामुळे मूर्ती लहान वाटली  तरी त्याची कीर्ती महान बनत चालली आहे. जितेंद्र हा एक चांगला अभिनेता आहेच पण तो लेखक आणि कवी देखील आहे.

सूत्रसंचालन करताना आपली स्क्रिप्ट जितू स्वतःच लिहितो.  ‘कोंबडी पळाली’ हे जत्रा सिनेमातील मजेदार गाणं त्याचंच बरं का..!!  ह्या पुढे त्याच्या ह्या इतर कलागुणांचे दर्शनही सतत चाहत्यांना घडो अशी आशा…!! बाकी ह्यापुढे जिंतेंद्र म्हटलं की ‘डोळ्यात फक्त भीतीच दिसणार’ असच वाटतंय..

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...