मराठी चित्रपटांची कान्स मध्ये धडक

 

कान्स चित्रपट महोत्सव जगभरातील चित्रपट निर्माते आणि प्रेक्षक यांच्यासाठी आकर्षणाचा विषय असतो.  फ्रांस मध्ये होणाऱ्या या महोत्सवाचे जगभरात अनेक चाहते आहेत. यंदाच्या कान्स महोत्सवात तीन मराठी चित्रपटांना स्थान मिळाले आहे. हे तीन चित्रपट कान्स चित्रपट महोत्सवाच्या “कान्स फिल्म मार्केटच्या” मराठी चित्रपट बूथ वर झळकतील. मराठी चित्रपटांनी कान्स मध्ये स्थान मिळवण्याचे हे सलग तिसरे वर्ष आहे.

या वर्षी निवड झालेल्या 3 चित्रपटांपैकी एक चित्रपट धोंडिबा बाळू कारंडे या निर्मात्याचा आहे. करांडे यांनी महाविद्यालयीन जीवनात नाटकांची आवाड जोपासली होती. त्यानंतर त्यांनी लघुपट आणि महितीपटांवर काम करणे सुरू केले. याआधी त्यांनी कधीच कोणत्याही चित्रपटाचे दिग्दर्शन केले नाहीये. पदर्पणातील त्यांचा सिनेमा पाळशीची पीटी, थेट कान्स मध्ये सहभागी होत आहे आणि ती त्यांच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे.

हा चित्रपट याआधी पुणे चित्रपट महोत्सव आणि सोलापूर चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला आहे. दिग्दर्शक आणि चित्रपट या दोन्ही साठी, हा पहिलाच आंतरराष्ट्रीय महोत्सव आहे. अनेक नव्या दमाच्या चेहऱ्यांनी आणि त्यांच्या विनासायास अभिनयाने हा चित्रपट सजला आहे.

कान्स चित्रपट महोत्सवात या चित्रपटाव्यतिरिक्त अजून दोन मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत, ते म्हणजे दीपक गावडे यांचा ‘ईडक’ आणि मनोज कदम यांच्या ‘क्षितिज’.

या वर्षी कान्स चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी सुमारे 67 चित्रपट स्पर्धेत उतरले होते. निवड समितीने पहिल्या फेरीतून 26 चित्रपट निवडले आणि अखेरच्या फेरीतून वरील 3 चित्रपट निवडले. या निवड समिती मध्ये चित्रपट निर्माते रघुवीर कुलकर्णी, समीक्षक आणि लेखिका रेखा देशपांडे, निर्माते मिलिंद लेले, पटकथा लेखिका अरुणा जोगळेकर आणि अभिनेते प्रेम पवार यांचा समावेश होता.

भारतीय चित्रपटांना जगभरात स्थान मिळावं म्हणून केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने विशेष प्रयत्न घेतले आहेत. पण यात फक्त महाराष्ट्र राज्यातून चित्रपट सहभागी होतात. 2016 साली विनोद तावडे यांच्या प्रयत्नामुळे 3 चित्रपट कान्स मध्ये सहभागी होऊ शकले.

 2016 मध्ये कान्स चित्रपट महोत्सवात मकरंद माने यांचा ‘रिंगण’, शिवाजी लोटन पाटील यांचा ‘हलाल’ आणि पुनर्वसू नाईक यांचा ‘वक्रतुंड महाकाय’ हे मराठी चित्रपट सहभागी झाले होते. 2017 मध्ये संदीप भालचंद्र पातेली यांचा ‘दशक्रिया’, प्रकाश कुंटे यांचा ‘सायकल’ आणि गिरीश जोशी यांचा ‘टेक केअर गुड नाईट’ हे चित्रपट निवडले गेले होते.