महेश मांजरेकर मराठी बिग बॉस

सध्या दूरचित्रवाणीवर मालिकांच्या बरोबरीने गाजतात ते कार्यक्रम म्हणजे रिअॅलिटी शोज्. नृत्य, संगीत, अभिनय, साहस, विनोद अशा अनेक प्रकारच्या कला आणि कलाकारांना अशा कार्यक्रमांमुळे वाव मिळतो. त्यांची कला जगासमोर सादर करण्याची त्यांना संधी मिळते. नवोदित गायकांना पुढे संगीत क्षेत्रात प्रगती करता यावी म्हणून सुरु झालेल्या तेव्हाचा शोज मध्ये आणि आत्ताच्या शोज मध्ये खूप फरक आहे. एकसारख्या धाटणीच्या त्या शोज न मागे टाकत खतारों के खिलाडी सारखे शोज् ही खूप गाजले. असंच एक शो ज्याला प्रेक्षांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं, तो म्हणजे ‘बिग बॉस’.

बिग बॉस हा शो नेदरलँड्स च्या बिग ब्रदर या शो वर आधारित आहे. भारतात सर्वप्रथम हा शो कलर्स टीवी या वाहिनीवर आला. या शो मध्ये जाही स्पर्धक ठराविक काळासाठी एक घरात एकत्र राहून बिग बॉस ने नेमून दिलेली कामे पूर्ण करत असतात. प्रेक्षकांचे आणि घरातील इतर स्पर्धकांचे मत लक्षात घेऊन दर आठवड्याला एक स्पर्धक बाद होत जातो.

नुकताच हा शो मराठीत येणाच्या घोषणा झाल्या आणि मराठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली. मराठी प्रेक्षक वर्गातील अनेक जण बिग बॉस चे चाहते आहेत आणि हा शो आपल्या भाषेत येणार म्हणून ते खूप खुश झाले. बिग बॉस चे एक आकर्षण म्हणजे सूत्रसंचालक.

या शो चे सूत्रसंचालन करण्यासाठी अत्यंत तडफदार व्यक्तिमत्त्व असणारी व्यक्ती लागते. हिंदीत हे काम सलमान खान आणि संजय दत्त यांनी केले होते. नुकत्याच हाती आलेल्या माहिती नुसार मराठी बिग बॉस साठी या कामाची धुरा महेश मांजरेकर यांच्या हाती सोपवण्यात आली आहे. अत्यंत वेगवेगळ्या कथा मराठी चित्रपटातून मांडण्यात महेश मांजरेकर तरबेज आहेत. सरळ सोट धाटणीच्या चित्रपटांपेक्षा त्याच्या चित्रपटांमध्ये कथानक अतिशय प्रगल्भ असते आणि त्यामुळे त्यांचा दरदरा आहे. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, दे धक्का, नटसम्राट, काकस्पर्ष अशा  एकाहून एक सरस चित्रपटांची निर्मिती तसेच वास्तव, अस्तित्व, विरुद्ध अशा हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे. गेली अनेक वर्षे त्यांच्या नावाचा दबदबा असल्याने साहजिकच या शो कडे खूप उत्सुकते.ने पहिले जात आहे.

हा शो लवकरच कलर्स मराठी या वाहिनीवर प्रक्षेपित होणार आहे. यातील स्पर्धक कोण असतील याबाबत अजूनही काही बातमी वाहिनीने प्रसारित केली नाही