रजनीकांत वर मराठीचा प्रभाव

रजनीकांत म्हणजे दाक्षिण्यात चित्रपट सृष्टीचा देव. अनेक वर्षे दाक्षिण्यात सिनेमे गाजवून त्यांनी बॉलीवूड मध्येही यशस्वी चित्रपट केले. रजनीकांत यांचा एक चित्रपट, काला, एप्रिल महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. एक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अंजली पाटील हिने या चित्रपटाबद्दल काही खुलासे केले. त्यातील सगळयात महत्त्वाचा खुलासा म्हणजे की हे कथानक मराठी जीवनशैलीने प्रभावित झाले आहे.

येत्या 27 एप्रिल ला काला हा चित्रपट प्रदर्शित होईल. अनेक दिग्गज कलाकारांच्या अभिनयाने हा चित्रपट सजला आहे. रजनीकांत, नाना पाटेकर, अंजली पाटील आणि हुमा कुरेशी प्रमुख भूमिकेत या चित्रपटात दिसतील. अंजली पाटील म्हणाली की या चित्रपटावर मराठी संस्कृतीचा खूप प्रभाव आहे. रजनीकांत करत असलेल्या भूमिकेचे नाव त्यांचे खरे नाव आहे. शिवाजीराव गायकवाड नावाच्या व्यक्तीची भूमिका ते साकारत आहेत.

न्यूटन सारख्या वजनदार चित्रपटातून आपल्या समोर आलेली अंजली पुयाल चारुमती गायकवाड नावाच्या मुलीही भूमिका साकारत आहे. मूळची तामिळ असलेली ही मुलगी धारावी परिसरात वाढली आहे. सामाजिक आणि राजकीय रंग असलेल्या या चित्रपटात या मुलीची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.

अंजली पुढे म्हणाली की या चित्रपटात रजनीकांत यांच्या प्रेयसीची भूमिका हुमा कुरेशी ने केली आहे. पण याबाबत तिची काहीच तक्रार नाही कारण तिच्या पात्राला चित्रपटात खूप वजन आहे. या पात्राशिवाय कथानक पुढे सरकत नाही.

मराठी संस्कृतीत रुजलेला हा चित्रपट राजकीय परिस्थितीचे अचूक चित्रण करतो. या चित्रपटाचे अर्धे चित्रीकरण मुंबईत तर उरलेले अर्धे तामिळनाडू मध्ये झाले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प रणजित यांनी केले आहे तर खुद्द रजनीकांत यांचा जावई धनुश याने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. रजनीकांत, नाना पाटेकर, हुमा कुरेशी, अंजली पाटील यांव्यतिरिक्त या चित्रपटात यतीन कार्येकर, पंकज त्रिपाठी, रवी काळे, सायली शिंदे, अरविंद आकाश, सुकन्या, ईश्वरी राव यांसारखे दिग्गज चेहरे दिसतील.

अंजलीने या चित्रपटाबद्दल आणखी एक खुलासा केला. ती म्हणाली की तिच्या भूमिकेसाठी कणखर अभिनेत्री हवी होती. तिच्या एका श्रीलंकन चित्रपटातील तिचे काम बघून दिग्दर्शकांनी तिची निवड केली. रजनीकांत यांनी या गोष्टीला दुजोरा दिला. तिने यापुढे असेही सांगितले की रजनीकांत सरांबरोबर काम करण्याचा तिचा अनुभव खूपच चांगला होता. रजनी सर स्वतः खूप नम्र आणि मेहनती आहेत त्यामुळे ते त्यांच्या कामगिरीचे दडपण दुसऱ्या कलाकारांवर येऊ देत नाहीत.