सई ताम्हणकर फेमिना नाईट मध्ये

सई ताम्हणकर मराठी सिनेसृष्टीतली एक नामवंत अभिनेत्री आहे. तिने आपल्या कामाची चुणूक हिंदी चित्रपटांमधूनही दाखविली आहे. सईचा जन्म सांगलीत एका मध्यमवर्गीय घरात झाला. अनुबंध या मराठी मालिकेमुळे तिला खूप प्रसिद्ध मिळाली आणि ती अभिनेत्री म्हणून नावारूपास येऊ लागली. अनुबंध बरोबरच या गोजिरवण्या घरात, साथी रे, अग्निशिखा, कस्तुरी अशा मालिकांमध्येही ती झळकली.

गजनी या चित्रपटातून सईने बॉलिवुड मध्ये पदार्पण केले. लहान पण लक्षवेधी असणाऱ्या त्या भूमिकेबरोबर तिने आपली घोड दौड चालू ठेवली.  मराठी सिनेसृष्टीत दुनियादारी,  गुरुपौर्णिमा, नो एन्ट्री पुढे धोका आहे,क्लासमेट्स, वजनदार असे एकाहून एक चित्रपट करीत सई रोज यशाचे नवे शिखर गाठते आहे. सनई चौघडे हा चित्रपट तिच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. अत्यंत नाजूक विषयावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटामुळे तिने खूप प्रसिद्ध मिळविली. यानंतर पिकनिक, हाय काय नाय काय अशा चित्रपटांनी तिची वाटचाल कायम ठेवली. दुनियादारी हा चित्रपट परत अत्यंत वेगळया पठडीतला होता. दुनियदारीमधील तिचा पेहराव, संवाद, केशभूषा आणि एकंदरच व्यक्तिमत्त्व यामुळे शिरीन ची भूमिका तिने खूप चांगल्या प्रकारे निभावली.

लालबाग परळ आणि नो एन्ट्री पुढे धोका आहे या चित्रपटात ती काहीश्या बोल्ड अवतारात दिसली होती. पण तिचे त्याबद्दल खूप कौतुक झाले. तिच्या भूमिकांना तिने योग्य तो न्याय दिल्याबद्दल चित्रपट सृष्टीने आणि प्रेक्षकांनी तिला डोक्यावर घेतले. वजनदार हा चित्रपटही काहीश्या वेगळ्या विषयावर भाष्य करणारा ठरला.

उत्तम अभिनय, वेगवेगळ्या वेशभूषा आणि बोल्ड अवतार यामुळे सई नेहमीच चर्चेत असते.यामुळेच तिचा चाहतावर्ग देखील मोठा आणि बऱ्याच प्रमाणात विस्तारीत आहे. या सगळ्यामुळे तसेच गरजूंना मदत करण्याचा स्वभाव व चित्रपटाची निवड ,येऊ घातलेले चित्रपट यामुळे सई नेहमीच चर्चेत असते. या सुंदरीने नुकताच फेमिना फॅशन नाईट या सोहळ्यात शीतल बियानी यांनी डिझाईन केलेला पांढरा शुभ्र ड्रेस घालून रॅम्प वर अवतरण केले आणि तिचा हा पेहराव रातोरात प्रसिद्ध झाला.

सई ने या सोहळ्यात प्रथमच रॅम्प वॉक केला .जेव्हा तिला या पहिल्या रॅम्प वॉक च्या अनुभवाबद्दल विचारलंं तेव्हा सईने सांगितले की पहिलाच प्रयत्न असल्यामुळे काहीसं दडपण होतं परंतु उत्सुकताही तेवढीच होती.त्या ड्रेस मध्ये मला अगदी परीसारखं वाटतं होतं असं सई त्यात आवर्जून सांगते.